कवळास Part -2
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 31 ต.ค. 2024
- नमस्कार मंडळ.....
आजचा video तुम्ही नक्की पहा..... कवळास उत्सव
#Part - #2 आवर्जून पहा .... त्याचबरोबर Like and share सुद्धा करा....
🛑 SUBCRIBE 🛑
ज्येष्ठ शुद्ध अष्टमीच्या दिवशी रात्री जैतीर देवरूपी व्यक्ती मंदिरालगतच्या काही घरांच्या भेटीस जाते. त्या भेटी पूर्ण होईपर्यंत मध्यरात्र उलटून गेलेली असते. पहाटेचे एक-दोन वाजलेले असतात. त्या सुमारास गावात देवाच्या जागराला सुरुवात होते. यानंतर भाविकांच्या समस्या, गा-हाणी, नवसबोलणं (पडस्तळं) ऐकून देवरूपी व्यक्तीकडून उपाय सुचवणं, भूतपिशाच्चादी बाधा काढणं, इतर देवकार्य करणं यांसारखे विधी मधूनमधून सुरू असतात. त्यानंतर देवस्थानच्या मानकरी देवाला खेळवतात. जागराचं हे मुख्य आकर्षण आहे. ते मुख्य देवकार्य संपत आल्यावर मानकरी आणि गावातील सर्व लहान-थोर स्त्रीपुरुषांना देव जैतीर कौल (आशीर्वाद) देतो. त्यानंतर प्रत्येक चाळ्यावर नारळ फोडून त्यांना संतुष्ट करतो. विविध वाद्यनादांच्या जयघोषात स्वगृही प्रयाण करतो. अशा त-हेने 11 दिवसांचा हा देवाचा वार्षिक महोत्सवाचा आनंद सोहळा ‘कवळास’ने संपतो. ‘कवळास’ या जत्रेच्या शेवटच्या दिवशी गा-हाणी घालण्याचा कार्यक्रम होतो. या कार्यक्रमाने जत्रोत्सवाची सांगता होते. जैतिरोत्सवाच्या काळात स्पृश्यास्पृश्यता भेदभाव मानला जात नाही, हे या महोत्सवाचं प्रमुख वैशिष्टय़ आहे. या देवाला सोन्या-चांदीच्या तु-यांचा नवस करतात. या देवाचा संचार फक्त महोत्सवी दिवसांतच होत असतो. बाकी कालावधीत जैतोबाच्या मूर्तीस तांदळाचा प्रसाद लावून कौल घेतले जातात. आणि वर्षभरातील इतर धार्मिक कार्य तरंगामार्फत पूर्ण केली जातात......
😍 Thank for Watching 😍