Shri Swami Samarth Maharaj Math Kopari Thane East

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 มี.ค. 2024
  • Discover the holy Shri Swami Samarth Maharaj Math in Kopari, Thane East! This spiritual center is dedicated to the renowned Indian saint, Shri Swami Samarth. Learn more about his teachings and meditate in this peaceful and serene environment.
    Shri Swami Samarth Maharaj Math Kopari Thane East
    Discover the holy Shri Swami Samarth Maharaj Math in Kopari, Thane East! This spiritual center is dedicated to the renowned Indian saint, Shri Swami Samarth. Learn more about his teachings and meditate in this peaceful and serene environment.
    श्री स्वामी समर्थ महाराज हे इ.स. १८५६-१८७८ या कालावधीत होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते. श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात. श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी मनोभावे सेवा करतात. सर्व मठात स्वामींची काकड आरती, सकाळी सायंकाळी आरती होते. इथे वाचा श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती.
    जय जय सद्-गुरु स्वामी समर्था,
    आरती करु गुरुवर्या रे।
    अगाध महिमा तव चरणांचा,
    वर्णाया मति दे यारे॥धृ॥
    अक्कलकोटी वास करुनिया,
    दाविली अघटित चर्या रे।
    लीलापाशे बध्द करुनिया,
    तोडिले भवभया रे॥१॥
    यवन पूछिले स्वामी कहाॅ है,
    अक्कलकोटी पहा रे।
    समाधी सुख ते भोगुन बोले,
    धन्य स्वामीवर्या रे॥२॥
    जाणिसे मनीचे सर्व समर्था,
    विनवू किती भव हरा रे।
    इतुके देई दीनदयाळा,
    नच तव पद अंतरा रे॥३॥
    श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
    जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था
    आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !!
    जयदेव जयदेव..!!
    छेली खेडेग्रामी तू अवतरलासी,
    जगदुध्दारासाठी राया तू फिरसी
    भक्त वत्सल खरा तू एक होसी,
    म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी !!
    जयदेव जयदेव..!!
    त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार,
    याची काय वर्णू लीला पामर
    शेषादीक शिणले नलगे त्या पार,
    तेथे जडमूढ कैसा करु विस्तार !!
    जयदेव जयदेव..!!
    देवाधिदेव तू स्वामीराया,
    निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पाया
    तुजसी अर्पण केली आपली ही काया,
    शरणागता तारी तू स्वामीराया !!
    जयदेव जयदेव..!!
    अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले,
    किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे.
    चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले,
    तुझ्या सूता नलगे चरणावेगळे !!
    जयदेव जयदेव..!!

ความคิดเห็น •