श्री स्वामींचे नामस्मरण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • Shri Swami Samarthश्री स्वामींचे भक्त निरनिराळे नामस्मरण करतात. मूळ शब्द ‘नामस्मरण’ त्याचे विभाजन नाम: स्मरण! ‘स्मरण’ या शब्दामध्ये स: - अमरण! आणि अ-मरण या शब्दामध्ये अ-मरण! असा अर्थ बोध आहे. उदाहरणासाठी ‘श्री स्वामी समर्थ’ हा सहा अक्षरी जप आहे, मंत्र आहे. म्हणाल तर जप नाहीतर मंत्री नक्की! पण श्री स्वामींचे जप हे मंत्र सुद्धा आहे. कारण ते स्वयंभू मंत्र आहेत. हे जप श्री स्वामींच्या भक्तांना उत्स्फूर्तपणे सुचलेले-स्फुरलेले आहेत. श्री स्वामी समर्थ या जपांत शेवटी ‘अ’ आहे, जसे ‘दत्त’ शेवटी असते. ज्या जपाची सुरुवात ‘ॐ’ ने होत नाही त्याला जप असे म्हणतात. ज्या जपाची सुरुवात ओमने आणि शेवट ओमने होतो त्याला महामंत्र असे म्हणतात. मंत्राचे हवन होणे गरजेचे आहे. तो एक स्वतंत्र विषय आहे. कोणत्याही मंत्राच्या शेवटी/ जपाच्या शेवटी ‘अ’ येत असेल तर त्याला सामर्थ्यशाली/ शक्तिशाली जप असे म्हणतात. उदा. श्री स्वामी समर्थ, श्री दत्त इत्यादी. व्यवहारांत, कुटुंबात आम्ही म्हणतो, आजच आत्ताच मामाची आठवण काढली आणि मामा आला. भेटला म्हणजे आठवण काढली आणि दत्त म्हणून समोर उभा राहिला.
    आता श्री स्वामी समर्थ हा जप किंवा मंत्र! हा जप श्री बाळप्पा नावाच्या एका भक्ताला सुचला, कारण त्यांचे पोट दुखायचे! नाभीस्थानांत एक छोटीशी विषाची पुडी अडकली आहे. ती सव्वा लाख जप झाल्यानंतर आपोआप बाहेर येईल. आता हा सव्वा लाख जप कोणता करायचा असा प्रश्न श्री बाळप्पा सौ. बाळप्पा यांना पडला. कोणी ग्रामदेवतेचा तर कोणी कुलदेवतेचा सव्वा लाख जप केला, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. शेवटी बाळप्पा श्री स्वामी समर्थासमोर भल्या पहाटे बसले आणि श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण मनांतल्या मनांत पुटपुटू लागले. श्री स्वामींनी मान हलवून होकार दिला. एकांतामध्ये काळ्या मारुती गुहेत जा आणि सव्वा लाख जप कर, तू आपोआप बरा होशील. त्याप्रमाणे श्री समर्थ रामदास स्वामींनी अक्कलकोट येथे स्थापन केलेला हाफक्याच्या मारुती मंदिर गुहेत श्री. बाळप्पा गेले तेथे सतत एक रकमी सव्वा लाख जप केला आणि नाभिस्थानातून विषाची बारीक पुडी बाहेर आली. म्हणून श्री स्वामी समर्थ हा शास्त्र शुद्ध-स्वयंभू आणि स्वत: श्री स्वामी समर्थाची अनुमती असलेला जप मंत्र आहे.
    आता या जपाचा अर्थ काय आहे. श्री म्हणजे ऐश्वर्य, औदार्य, स्वामी म्हणजे स्वत:मधील ‘मी’चे स्वाहा: करणारी शक्ती आणि समर्थ म्हणजे असमर्थाना समर्थ करती एक शक्ती! श्री स्वामी समर्थ हा एक सहा अक्षरी मंत्र आहे. हा जप आम्ही एकशे आठवेळा जेव्हा करतो तेव्हा त्याचे एक आवर्तन पूर्ण होते. हा जप सहा अक्षरी आहे. तेव्हा सहा माळी जप सर्वसामान्य झाला तर जपाची सहा आवर्तने होऊन त्या जपाची परीपूर्णता जप करणा-याला लाभते. सहामाळी जप म्हणजे १०८ / ७६ = ६४८ इतका. आता ६४८ पैकी ६५ जप संख्येचे हवन झाल्यास त्या जपाची संपूर्ण परीपूर्णता जपकर्त्यांला त्या वास्तूला लाभते. आता हाच जप उदा. श्री स्वामी समर्थ एकूण दहा लोकांनी (भक्तांनी) केला तर १०८ /७१० = १०८० इतकी स्वामी भक्तांना जप करणा-यांना १०८० इतकी हॉर्स पॉवर शक्ती लाभते आणि वातावरण शुद्धीकरण्यास (वायुमंडळ) मदत होते. त्यामुळे निसर्गातील सात्विक शक्ती साधकांकडे आकर्षित होतात. त्यांच्याकडून चांगली कामे ईश्वरी शक्तींकडून करून घेतली जातात. अशा प्रकारचे जप सामर्थ्य निर्माण करताना जप करणा-यांमध्ये अहंकार, स्वार्थी वृत्ती, मी एकटा हे करीन, स्वामी समोर येणारी धनसंपदा घरी नेणे, स्वामी समोर येणारी वस्र्े, खाद्य पदार्थ, सोने-नाणे घरी नेणे अशी वृत्ती असल्यास त्याचे वाईट परिणाम साधकांवर होतात. घरच्या कोर्ट कचे-यांत अपयश येणे, घरातल्या स्त्रीयांमध्ये रोगवृत्ती बळावणे, विस्मरणासारखे रोगवृत्ती, आजारपण बळावणे, श्री स्वामींचा हात सोडून दुस-या पंथात जाणे इत्यादी गोष्टी बळावतात.
    आता पुढे जाऊन जर ज्ञानाचा अर्थ काढला, तर श्री स्वामी समर्थ हा सहा अक्षरी मंत्र आहे. श्री स्वामी समर्थ समाधी घेऊन शंभर वर्षे होऊन गेली. म्हणजे श्री स्वामी समर्थ सहा अक्षरी मंत्री आहे. ही सहा अक्षरे १०८ वेळा म्हणायची तर एकूण जप हा १०८ /७६ = ६४८ म्हणजे एक १०८ मण्यांची माळ घेऊन हा जप केला तर तो ६४८ वेळा स्मरण झाले जप झाला. एकूण दहा माळी जर जप झाला तर तो ६४८० इतका जप झाला. हीच श्री स्वामी समर्थ जपाची फार मोठी जादू आहे. म्हणूनच सर्वानी मिळून जप केलेला स्वामींना खूप आवडत असे, त्याला सांघिक जप असे म्हणतात. सांघिक जप खूप मोठ्ठी सांघिक नामस्मरणाची शक्ती निर्माण करते, कारण प्रत्येक अक्षरात मंत्रोक्त, वेदोक्त शक्ती आहे. आमचा वारकरी सगळ्यात गोष्टींनी श्रीमंत का आहे? कारण तो जपतो,
    ।। रामकृष्ण हरी जयजय रामकृष्ण हरी।।
    कारण या जपांतला प्रत्येक शब्द नामरूप आहे. यात १६ अक्षरांचा समावेश आहे. हा जप १०० वेळा जर केला तर तो १६०० वेळा जप होतो. त्या जपाची शक्ती त्या वारक-याबरोबर कायम राहते. म्हणून वारीच्या वेळेस हे वारकरी जबरदस्त अभदान करू दाखवितात. यांचे नाव वारकरी ते जपतात राम कृष्ण हरी, कोणाची हिंमत आहे यांच्यावर वार करण्याची!
    सर्व बोलू या ।। श्री स्वामी समर्थ।। श्री स्वामी समर्थांचा एक दुर्मीळ फोटो आहे, त्यांत श्री स्वामी समर्थांच्या हातात जपाची माळ आहे. एकदा त्यांचे लाडके भक्त श्री बाळप्पा श्री स्वामींना विचारतात ‘‘स्वामी आम्ही तुमचा, तुमच्या नावाचा जप करतो तुम्ही कोणता जप करता? कोणाचा जप करता?
    श्री स्वामी फक्त एकच वाक्य सांगतात. जो माझा जप करतो, त्याला मी जपतो! म्हणूनच घराघरांतून सांघिक जप झाला पाहिजे.
    ।। श्री स्वामी समर्थ।।
    #swamisamarth
    #swamisamarthsongs
    #akkalkotaswamy
    #akkalkotswami
    #swamisamarthmantra
    #swamisamarthkatha
    #swamisamarthringtone
    #swamisamarthwhatsappstatus
    #swamisamarthnewstatus
    #shreeswamisamarth
    #shreeswamisamarthanubhav
    #swamisamarthashtak
    #swamimaharaj
    #shreeswamisamarth
    #shreeswamisamarthsong
    #shreeswamisamarthsamadhidarsahn
    #akkalkotswamisamarthmaharajkijay

ความคิดเห็น • 15