बाणाईची झणझणीत वजडी बनवण्याची अगदी सोपी पद्धत | vajri recipe | वजरी रेसिपी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • बाणाईची झणझणीत वजडी बनवण्याची अगदी सोपी पद्धत | vajri recipe | वजरी रेसिपी #vajdi
    #vajdirecipe
    #वजडी
    #वजरी #marathirecipe #dhangarijivan #siduhake #konkanvlog
    #mutton
    #मटण
    #धनगरीमटण
    #muttonrecipe
    #muttoncurry
    #dhangar
    #dhangarrecipe
    #धनगर
    #balumama
    #siduhakevlog
    #धनगरीस्वयंपाक
    mutton dhangari special

ความคิดเห็น • 859

  • @vitthalmane2941
    @vitthalmane2941 ปีที่แล้ว +134

    बाणाईताईचा वझडी फ्राय करण्याची पध्दत टापटीपपणा,लेकरावरील प्रेम,बोलण्याची पध्दत,कुंटुंबाची काळजी,कष्टाळूपणात समाधानी पणा दिसून येतो .खर सुख उपभोगता . सागरला शिकवा. छान व्हिडीओ केला आहे .बाणाई खरोखर वाघीण आहे.

  • @pravinsutub
    @pravinsutub ปีที่แล้ว +105

    माऊली तुमच्या चेहऱ्यावरचे समाधान ,प्रेम आणि आनंद या जेवणात उतरला आहे त्यामुळे ते जेवण खूपच चविष्ट असणार यात काही वाद नाही,सदैव असेच आनंदी राहा !

  • @akshaytaware3918
    @akshaytaware3918 ปีที่แล้ว +45

    श्री बाळू मामा आणि बिरोबा देव कृपेने संसार सुखाचा होवो 🙏🙏🧡

  • @SunilG.1010
    @SunilG.1010 10 หลายเดือนก่อน +11

    ही आहे साधी राहणी....ताई ने अशी वजडी बनविली की नुसता व्हिडिओ पाहुनच तोंडाला पाणी आले ...एकदम भारी 👌👌👌👌

  • @munnarathod3470
    @munnarathod3470 ปีที่แล้ว +65

    मी आजपर्यंत कधी पाहिलं नाही की धनगराच्या बाई च पदर कधी डोक्याच्या खाली आहे 🙏🙏🙏🙏 ताई तुम्ही खूप आणि खूप छान बोलता आणि त्यापेक्षा छान वजडी 🙏🙏🙏🙏

  • @dagadudhoduvispute4333
    @dagadudhoduvispute4333 ปีที่แล้ว +36

    बाणाईताई सहजच संभाषण करीत आहे. सराईत व्यक्ती सुद्धा इतके सहज सुंदर बोलणार नाही.फारच सुंदर ताई.किती समाधानी आहे ताई.👍👍👌

  • @TERROR_RUYO
    @TERROR_RUYO 10 หลายเดือนก่อน +10

    निसर्गाच्या सानिध्यात राहून आपले संपूर्ण आयुष्य घालवणारे धनगर बांधव. आपला पूर्ण महाराष्ट्र ला. अभिमान आहे. साधे जीवन, निर्मळ मन, ढासून भरलेली इमानदारी. यांनीच शिवाजी महाराजांना खरी साथ दिली. अभिमान वाटतो बाणाई ताई तुमचा जवळ काही नसताना. एवढे आनंदी जीवन जगता. शूरवीर, लडाऊ जातीत आपण जन्म घेतला. हेवा वाटतो आपला. आपली रेसिपी पाहून. आंनद वाटला. आपणास खूप खूप शुभेच्छा. बांनाताई असेच आपल्या कुटुंब वर प्रेम करा 👍अभिमान वाटतो या धनगर भगिनीचा 🙏🙏🙏

  • @saaulzote2721
    @saaulzote2721 ปีที่แล้ว +56

    बानुबाई, तुमचा स्वभाव खुप छान आहे. तुम्ही वेदना घेऊन जगत आहात. तुमची वजडी ची रेसिपी अप्रतिम आहे. फाईव्ह स्टार हॉटेल पेक्षा पण खुप छान......

  • @maheshmaskar2742
    @maheshmaskar2742 ปีที่แล้ว +632

    मसाला वाटयला नाही कोणता मिक्सर नाही कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू तरीही रान माळावर आपला आनंदी संसार मांडणी फक्त एक 👑धनगराची वाघीण च 👑करू शकते.

  • @ajitsargar2285
    @ajitsargar2285 ปีที่แล้ว +69

    सलाम माऊली 🙏 किती कसरत ? शून्य आविर्भाव, आणि अद्वितीय कौशल्य, खरंच तूम्ही नावासारख्याच सार्थ आणि जिवनरूपी बानाई आहात. 🙏 देव तुम्हाला सदैव खुशहाल आणि आनंदी ठेवो. खुप खुप आदर आणि अभिमान वाटला तुमचा. Great 🙏

  • @sunitakamble6659
    @sunitakamble6659 ปีที่แล้ว +14

    बानाबाई तुमचे सहज बोलणे फार आवडले
    वजडी तर छानच केली . कमीत कमी साधनं असताना स्वयंपाक करणे ही एक कला तुमच्या कडेच शिकावी. नाहीतर घरभर साधने भरपूर पण जेवन मात्र कसलेपण असे पहायला मिळते. बानाबाई तुमचा साधेपणा व मनापासून जेवन बनवणे, सागरी प्रेमाणे बोलणे खूप आवडले.

  • @vijaykumarsupekar505
    @vijaykumarsupekar505 ปีที่แล้ว +16

    बाणा ताईच्या प्रत्येक हालचाली अणि बोलणे किती सहज सुंदर आहे, माझे लहानपण आठवले तेव्हा घरी चूल होती व आई स्वैपाक करताना सर्व काही असेच जसेच्यातसे या video मध्ये दाखविले आहे तसेच जेवण करायची.
    आम्ही धनगर नाही परंतु माझ्या आजोळी शंभर एक मेंढरे होती.(1975)
    तुमचे अभिनंदन अणि शुभेच्छा.

  • @neeldarshan6474
    @neeldarshan6474 ปีที่แล้ว +48

    बाणाई ताईंनी आजची बनवलेली वजडी रेसिपी अतिउत्तम, बाणाई ताईंचं बोलणं, वागणं, पदार्थ बनवतांना समजाऊन सांगण्याची पद्धत सारेच भारी. किती समजूतदार आहे बाणाई ताई. सिद्धू हाके दादा नशिबवान आहात तुम्हाला बाणाई ताई जोडीदार म्हणून जीवनात लाभल्या

  • @bhagyashritonape6955
    @bhagyashritonape6955 ปีที่แล้ว +46

    बनाईताई खरच तुम्ही खूपच सुंदर बनवली वजडी समाधानी जिवन जगणे म्हणजे काय ते हे ,लाखो करोडांच्या बंगल्यात महालात जे सुख समाधान मिळत नाही ते आपल्या वाड्यावर आहे really superb

  • @technicalanalysis....885
    @technicalanalysis....885 ปีที่แล้ว +34

    बघून खूप आनंद झाला तोंडाला पाणी आल्यावाचून राहत नाही...एक नंबर...👌👌

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 ปีที่แล้ว +122

    बाणाई खूप छान केली वाजाडी किती छान माहिती सांगतेस बोलन ऐकूनच तुझा स्वभाव खुपचं छान असणार बानाई सागर बाळा ल गोड पापा❤❤

  • @ATmobileStore
    @ATmobileStore 10 หลายเดือนก่อน +17

    ताई आपल्या महारष्ट्राची परंपरा जपली आहे तुम्ही डोक्यावरचा पदुर पडू दिला नाही हीच तर मराठी माणसाची शान आहे 🙏🙏🙏

  • @balunarayanpashte4771
    @balunarayanpashte4771 ปีที่แล้ว +13

    वाह वाह तुमच्या धनगरी जिवणाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे दादा वहिनी..किसन अर्चना आणि सागर छानच आहेत तुम्ही सगळे..आणि विशेष म्हणजे यूट्यूब वर सध्या जिकडे तिकडे तुमच्या साध्या सरळ आणि गोड स्वभावाची आणि तुमच्या चॅनेल ची जोरदार चर्चा होत आहे..सगळ्यांना तुमचं जीवनमान खूपच आवडू लागलं आहे..असेच राहा..आणि खूप मोठे व्हा..💐💐

  • @avinashwani2649
    @avinashwani2649 ปีที่แล้ว +4

    एक नंबर जेवण आणि जिवन
    मला अभिमान आहे की मी माझ्या परिवार सोबत हे छान जीवन अनेक वर्षे जगलो
    आज ताईच्या व्हिडिओच्या निमित्ताने अनेक बऱ्याच वर्षा पूर्वी च्या आठवणी जिवंत झाल्या आहेत
    धन्यवाद ताई आणि ही जीवन पद्धत नैसर्गिक पद्ध्तीने शूट करून आम्हाला पाठवल्याबद्दल

  • @gaurav-747
    @gaurav-747 ปีที่แล้ว +94

    अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर
    आधी हाताला चटके मग मिळते भाकर
    🙏🙏खूप छान दादा 👌👌

  • @siddheshwarwagre5197
    @siddheshwarwagre5197 ปีที่แล้ว +56

    बाणाबाई तुम्ही खूप छान वजडी बनवली आणि खूप छान माहिती दिली,आम्ही या पद्धतीने वजडी नक्की बनवू,व रानातील निसर्गम्ये जीवन फारच छान आहे तसेच तुमचा सागर खूपच गोड आहे.😊

  • @anandmk2902
    @anandmk2902 ปีที่แล้ว +42

    वाव बानाई आणि संपूर्ण हाके परिवार,,,
    मी इतकच बोलेल माझ्या आयुष्यात आता पर्यंत इतकी सुंदर श्रीमंती मी तरी बघितली नव्हती,,
    मनापासून नमस्कार

  • @sandhyathakur6931
    @sandhyathakur6931 ปีที่แล้ว +36

    बानाई,वजरी मस्त बनवली. बानाईचा स्वभाव चांगला आहे.परिस्थितीशी जुळवून घेणे ज्याला जमते त्याचे आयुष्य सुखी असते.

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 ปีที่แล้ว +24

    बनाई चां चेहरा नेहमी हसरा असतो ती कितीही थकली असली तरी तिचा डोक्यावरचा पदर कधीच पडत नाही तुमचा सागर पंन मस्त गब्बु झाला आहे असेच खुश रहा God bless all

  • @sanjaydour3976
    @sanjaydour3976 10 หลายเดือนก่อน +3

    खूप छान पद्धतीने बनविले, अगदी सहज उपलब्ध पदार्थ वापरून मनमोकळे पणे माहीत दिली, अगदी साधे पण उत्तर जीवन,

  • @vikaskasar5398
    @vikaskasar5398 ปีที่แล้ว +3

    जीवनात मानले तर समाधान आहे नाहीतर मृगजळरुपी अवास्तव जीवन जगण्याच्या नादात माणूस वास्तववादी जीवनापासून खुप दुर गेला आहे असे वाटते
    सिद्धू व बानाई यांच्याकडे पाहून सुखी जीवन कसे जगावे याची मनोमन जाणीव होते ग्रेट

  • @aparnabavdane2706
    @aparnabavdane2706 ปีที่แล้ว +14

    खूपच भारी वजरी बनवली ताईंनी आणि ताईंना मानलं पाहिजे की त्यांनी माळ राणावर राहून खूप आनंदाने गप्पा मारत स्वयंपाक केला 👌👌👌👌👌

  • @vijaygarud7290
    @vijaygarud7290 ปีที่แล้ว +11

    😋वजरी आणि बाजरीची भाकर 😋😋😋एक नंबर लागतंय राव 😋😋😋

  • @priyadarshaniwaghmode
    @priyadarshaniwaghmode ปีที่แล้ว +3

    बाणाई खूपाच छान वजडी बनवायची पद्धत , मि हि बनवुन् बघणार आहे. मस्त 👌👌👍

  • @anilphanase2423
    @anilphanase2423 ปีที่แล้ว +4

    जमीन म्हणजे त्याचं अंथरून, आकाश म्हणजे त्याचं पांघरून, ऊन, वारा, पाऊस, थंडी, या सर्वावर मात करत धनगर फिरत असतात, खूप खडतर प्रवास आहे,
    बानू ताई सुगरण आहे, सधू भाऊ व बनूताईस शुभेच्छा, सागर ला गोड पापा. 👌👍

  • @Ravindrbhivagaje
    @Ravindrbhivagaje ปีที่แล้ว +7

    बाईनी फार छान चवीष्ट वजडी बनवली. फार छान माहिती दिली,छोटा बाबू फार गोड आहे

  • @rupalikatkar
    @rupalikatkar ปีที่แล้ว +16

    बाणाई तुमचा स्वभाव खुप आवडतो मला अशाच हसत मुखाने नेहमी बोलत असता, रेसिपी छान बनवलीत आणि सागरच काय सांगावे खुप गुणी बाळ आहे त्याला ❤गोड गोड पापा आणि शुभाशीर्वाद ❤❤🙏🙏

  • @mokatebk8806
    @mokatebk8806 ปีที่แล้ว +9

    घरच्या स्रीया जेवण बनवतात ना त्याची बरोबरी जगात कोणी करू शकत नाही, कारण निःस्वार्थ पणे बनवलेलं हे जेवण स्वादिष्ट तर असतेच पण प्रेमाने बनवलेलं असतं. त्यांचा स्वार्थ एवढाच असतो तो म्हणजे हे जेवण आपल्या धन्याला आवडले पाहिजे.

  • @nitinvhorkate4812
    @nitinvhorkate4812 ปีที่แล้ว +6

    खूप छान देवाचा आशीर्वाद असाच तुमच्या पाठीशी राहून बिरोबाच्या नावानं चांगभलं

  • @georgenolis7824
    @georgenolis7824 ปีที่แล้ว +8

    वहिणी तुमचे जेवण पण भारी आणि बोलणं पण खुप भारी. जिवणाचा धावपळीत असे सुंदर क्षण वाटतंय आम्ही कुठे तरी विसरून गेलेलो आहोत. कोणत्याही साधण सामाग्री नसताना सुद्धा तुमच्या प्रेमाची मिश्रणने ह्या व्यंजनाळा इतकं उत्कृष्ट बनवून दिला आहे. आईची आठवण काढुन दिला.

  • @munagadekar-lm9ue
    @munagadekar-lm9ue ปีที่แล้ว +56

    खुप.छान रेसीपी बानाईताई सागरबाळ तर खूपच छान आहे जय मल्हार हाके दादा.तूमचे कुटूंब खूपच गोड आहे.

  • @An-ri7qu
    @An-ri7qu ปีที่แล้ว +119

    खुप छान. देव तुमच्या पाठीशी आहे. शहरातील लोक तुमच्या पुढे काहीच नाही ❤❤

  • @sainathhale1965
    @sainathhale1965 ปีที่แล้ว +10

    ताई खूप छान बनवल्या आणि तुम्ही डोक्यावरला पदर खाली पडू दिला नाही त्याच्यामुळे माझ्या मनापासून अभिनंदन 🙏🙏

  • @rajeshsarode9502
    @rajeshsarode9502 ปีที่แล้ว +7

    भोळी भाबडी मानसं आहे त्याच्यातच सुख मानणारी

  • @sonaligokhale6658
    @sonaligokhale6658 ปีที่แล้ว +50

    किती साधं, सहज, समाधानी जीवन 🙏🙏

  • @nitinugale7346
    @nitinugale7346 ปีที่แล้ว +22

    खुप छान! सागरच विशेष कौतुक कारण तो तुम्हा सर्वासोबत बसुन वेवस्थित जेवतो , आणि जी भाजी तुम्ही खाता तितकीच तिखट भाजी तो आवडीने खातो... खुप चांगले संस्कार तुम्ही सागर वर करताय... बाकी तुम्ही सर्व कुटुंबच खुप छान आहात. ... धन्यवाद...

  • @suhasmahajan9524
    @suhasmahajan9524 ปีที่แล้ว +13

    खूप सुंदर,तोंडाला पाणी सुटले.खरे मराठमोळे जेवण 👍

  • @dnyaneshwaringale8397
    @dnyaneshwaringale8397 ปีที่แล้ว +4

    खुप छान भाजी बनवली ताई तुम्ही

  • @rupakchitre
    @rupakchitre ปีที่แล้ว +5

    वहिनीसाहेब खुप छान समजवले व चविष्ट वजडी बनवली. भाकरी अन वजडी खायला तुमच्या वस्ती वर यायला आवडेल. धन्यवाद छान रेसिपी साठी. नमस्कार 🙏🏻

  • @rajendrapangavhane6739
    @rajendrapangavhane6739 ปีที่แล้ว +10

    World's best recipe made by banai great mother

  • @lalitaghatte387
    @lalitaghatte387 ปีที่แล้ว +1

    Jhnjhnit vajdhi. Bhnnat recipi lai bhari. Bakkal vajdi ke liya

  • @sanjaygujar8079
    @sanjaygujar8079 ปีที่แล้ว +2

    *वजडी बनवण्याची अतिशय सुंदर पद्धत आहे... आम्ही ही लहानपणी अशी भरपूर वजडी फ्राय खाल्ली आहे. धन्यवाद...🙏🙏*

  • @tejaswiniyadav5852
    @tejaswiniyadav5852 ปีที่แล้ว +7

    तोंडाला पाणी सुटले तुमची करण्याची पद्धत खूप वेगळी आहे आणि सोपी आहे तुमची रेसिपी खूप आवडली आम्ही नक्की करून बघू

  • @sudamchintamani3468
    @sudamchintamani3468 ปีที่แล้ว +8

    ताई खूप छान वजरी बनवली 🙏🙏

  • @ganeshmore5029
    @ganeshmore5029 ปีที่แล้ว +84

    तुमच्या व्हिडीओमध्ये साधेपणा आहे, आनंदाचे पंख पसरून कसे जगायचे हे अनुभवायला मिळते 😊

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 ปีที่แล้ว +13

    एक नंबर रेसिपी बनवली बानाईने--पाणी आलं तोंडाला👌👍

  • @santoshthorat8353
    @santoshthorat8353 ปีที่แล้ว +7

    बानू ताई तुमचे व्हिडिओ आणि तुमची धनगरी स्टाईल आम्हाला फार आवडते असेच नव नवीन व्हिडिओ करत जा आणि आम्हाला पण धनगरी जेवणाचा आस्वाद देत जा धन्यवाद ताई🎉

  • @shraddhadhage8728
    @shraddhadhage8728 9 หลายเดือนก่อน +2

    खूप छान ताई,मला तुमचा वीडियो खुपच आवडला.कोणत्याही सुख सुविधा उपलब्ध नसताना देखील इतका सुंदर स्वयंपाक तुम्ही केला.खूपच छान 👌🙏

  • @sagarpatil6912
    @sagarpatil6912 ปีที่แล้ว +28

    कधीतरी तुमच्या सोबत जेवायला मिळेल अशी इच्छा आहे.
    खूप छान असेच व्हिडिओ बनवत राहा

  • @sunitawarankar5927
    @sunitawarankar5927 ปีที่แล้ว +2

    The best.... Kitti sadhepana....

  • @ChandHajane
    @ChandHajane ปีที่แล้ว +4

    मी आजपर्यंत कधी पाहिलं नाही की धनगराच्या ❤बाई च पदर कधी डोक्याच्या खाली आहे .ताई तुम्ही खूप आणि खूप छान बोलता आणि त्यापेक्षा छान वजडी ❤ 👌👌👌👌

  • @ganeshkhirad3789
    @ganeshkhirad3789 8 หลายเดือนก่อน +3

    तुमच्या सारखी प्रेमळ धनगर लोकं आहेत म्हणून महाराष्ट्र जगात भारी आहे ❤

  • @arung7305
    @arung7305 10 หลายเดือนก่อน +1

    Banainchi vajadi,jwar bhakr resipi aavdli,aaple khup khup dhanywad.

  • @kalpanagajbhiye1190
    @kalpanagajbhiye1190 ปีที่แล้ว +3

    khup sunder sipak karta tumhi banabai masatc banawali wajdi

  • @bacheerwalale3347
    @bacheerwalale3347 ปีที่แล้ว +2

    Malapan khub awarte vajri

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 ปีที่แล้ว +3

    Mst 1 no tondat pani sutle . Khup chhan.

  • @somnathtembekar355
    @somnathtembekar355 ปีที่แล้ว +7

    खूपच छान रेसिपी होती. साधी पण आनंदी माणसं.

  • @santoshithape8652
    @santoshithape8652 ปีที่แล้ว +2

    Ekach no recipe ahe..................!
    konahila lajwel asi hi recipe, jo furnished kitchen madhe banwato.................an.................Banai tai...................assal chulhiwar......................!
    An hi recipe tumha gabhadyan peksha kadhihi surekh, sushil an manala bhavnari ahe.......................!
    🙏🙏🙏🙏🙏

  • @infospark131
    @infospark131 ปีที่แล้ว +7

    अख्खा संसार आकाशाच्या खाली कमाल आहे तरी आनंदी.🙏🙏

  • @sureshdaundkar4624
    @sureshdaundkar4624 ปีที่แล้ว +8

    आनंद म्हणजे काय असतो ते समजते ताई
    खूप छान कारण तुमचा स्वभाव खूपच छान

  • @MrBhujbalgv
    @MrBhujbalgv ปีที่แล้ว +4

    खुप छान recipe, मी कधी वजरी खाल्ली नाही, पण बानु ताई ची recipe पाहून घरी नक्की करणार आहे🙏

  • @ashokpatil4476
    @ashokpatil4476 ปีที่แล้ว +3

    फार मस्त आणि सोपी पद्धत आहे असेच व्हिडिओ बनवत जा

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 ปีที่แล้ว +3

    अतिशय वजडीडाळ बनवण्याची धनगरी पद्धत अशाच धनगरी रेसिपी दाखवा धन्यवाद.

  • @rajabhaujadhav8776
    @rajabhaujadhav8776 ปีที่แล้ว +3

    खुप छान ताई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम फारच छान वझडी आहे 🙏🙏👍👍

  • @rahuljadhav4274
    @rahuljadhav4274 ปีที่แล้ว +8

    आपले मराठी युट्युबर खूप खूप मोठे व्हावेत, खूप छान ताई🎉

  • @banighorpade-yi3xz
    @banighorpade-yi3xz ปีที่แล้ว +3

    Very beautiful and godblessyou

  • @savitakaup5283
    @savitakaup5283 ปีที่แล้ว +6

    लय भारी

  • @RahulSirsSparkAcademy
    @RahulSirsSparkAcademy ปีที่แล้ว +9

    कालच्या व्हिडिओ मध्ये मी कमेंट केली की दादा मटणाचा बेत लई दिवसापासून झाला नाही तर दादाने आज बेत आखला मस्तपैकी

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 ปีที่แล้ว +7

    बानाताई मला तुमचं बोलणं फारच आवडतं आणि रिसीपी पण असेच आपल्या रिसीपी दाखवत जा‌👌👌👌👌

  • @shailendra1635
    @shailendra1635 ปีที่แล้ว +25

    ताई आपल स्वयंपाक कौशल्य तर खूपच छान पण सगळ्यात भारी डोक्यावरच्चा पदर आणी तुमचा आनंदी चेहरा .....
    देव तुमचं भलं करो ताई .....

  • @nileshtodankar5478
    @nileshtodankar5478 ปีที่แล้ว +2

    Khup chan aahe recepie

  • @madhavtathe9234
    @madhavtathe9234 10 หลายเดือนก่อน +2

    सगळ्यात सुखी जिवन खर्च खुप छान जिंदगी आहे आहे राव खरच

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni ปีที่แล้ว +27

    भारीच जेवण बनवलं बाणाई ने . खूप मस्त ❤❤❤

  • @uttereshwarraut8623
    @uttereshwarraut8623 ปีที่แล้ว +2

    माणसाचं सुख भोवतालच्या कृतिम वास्तूत नसून तुमच्या कर्तव्या पूर्ण वागण्यात आहेत

  • @surendradeshmukh9095
    @surendradeshmukh9095 ปีที่แล้ว +3

    खरंच तुम्ही खूप भाग्यवान व श्रीमंत आहात 🙏🙏

  • @sagarshedge488
    @sagarshedge488 ปีที่แล้ว +5

    या सर्व जीवन प्रवासात त्यांना...कधी बेड रेस्ट ची गरज नाही लागत...पुन्हा मानवी जीवन या रस्त्याने जाणार..

  • @ganeshmunde7265
    @ganeshmunde7265 ปีที่แล้ว +4

    एकच नंबर दादा तुमचं जीवन पण आणि जेवण पण

  • @ruplakshmirecipe
    @ruplakshmirecipe ปีที่แล้ว +7

    खूप छान तुम्ही आणि तुमचे कुटुंब
    अप्रतिम रेसिपी बनवली आहे

  • @vishalgawande6360
    @vishalgawande6360 ปีที่แล้ว +18

    What a great video.

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 ปีที่แล้ว +3

    वहीनी कीर्ती छान बोलता छान बनवली वजडी तोंडाला पाणी सुटले 👌👌👌

  • @shitaljadhav1313
    @shitaljadhav1313 ปีที่แล้ว +2

    Ek no🙏🙏

  • @vishalchavan1591
    @vishalchavan1591 ปีที่แล้ว +13

    याला म्हणतात धनगरी ❤❤❤

  • @krushnakorade9042
    @krushnakorade9042 ปีที่แล้ว +2

    Khup Sundar

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 ปีที่แล้ว +1

    Waw Khupp Bhari Vajari
    Banvali to Tasty Apratim
    😋😋😋😋😋

  • @laxmikantbirje7248
    @laxmikantbirje7248 ปีที่แล้ว +2

    छान भाषे मदे बोललात

  • @Prashant-vm3zy
    @Prashant-vm3zy ปีที่แล้ว +2

    ताई, भाजी बघून तोंडाला पाणी सोटले.
    Great👌👌

  • @nitingund8189
    @nitingund8189 หลายเดือนก่อน +2

    बाणा ताई एक नंबर वजडी छान

  • @pravinthorat244
    @pravinthorat244 ปีที่แล้ว +12

    तुम्ही ताई विळ्या वर कांदा चिरला , माझ्या बायकोला आणि मला चाकू ने कांदा कापता येत नाही प्रॉपर, आम्ही ग्रांडर वापरतो यावरून तुम्ही विचार करू शकता मुंबईत पैसा आहे पण सुख नाही हो , मला नेहमी हेवा वाटतो तुमच्या स्वयंपाकचा कारण आठवड्यातून पाच दिवस आम्ही बाहेरच खातो

  • @s-sn6ro
    @s-sn6ro ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर आहे रेसिपी ! ताई धन्यवाद ! जय मल्हारी !

  • @mahadevkuchekar172
    @mahadevkuchekar172 ปีที่แล้ว +1

    तुम्ही, बाणाईताई, जीव ओतून वजडी सारखा अन्नपदार्थ बनवत आहात. आणि जिथे जीव ओतला जातो, तिथे उत्तम पदार्थ तयार होतो. आणि आपली साधी सरळ भाषा, लक्ष वेधून घेतेय. सुंदर व्हिडीओ तयार केलेला आहे. तुमच्यासाठी पुन्हा एकदा Like.

  • @vijayavaghade5796
    @vijayavaghade5796 ปีที่แล้ว +2

    !! धन्यवाद खुपच छान!! रेसीपी खरोखरच!!!!
    !! खुपच लाजवाब!!!!! धन्यवाद खुपच छान!
    !!👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍!
    !!❤❤❤❤❤❤🌹🌹❤❤❤❤❤!

  • @sakharamtambe1513
    @sakharamtambe1513 ปีที่แล้ว +1

    ताई नमस्कार 🙏🏻
    खुप साद सरळ आनंदी जीवन आहे
    खरोखरच यांच्या समोर बाकी शहरी भागातील लोक झिरो आहेत
    देव पाठीशी आसतो यांच्या

  • @santoshithape8652
    @santoshithape8652 ปีที่แล้ว +1

    Dada, Khupach chan recipe .............................vahinichi.............!
    ekdum mast bet aahe Rao............................!
    Bajirao ahat tumhi.......................itkech!🙏

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 ปีที่แล้ว +2

    खुपच छान आहे धनगर वाडा❤️❤️👌👌👌

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 ปีที่แล้ว +18

    अप्रतिम 👌👌लयभारी 👌