Maai Bappa Vithala | Lyrical Song | Ajay Gogawale, Atul Gogawale | Nitin-Prasad, Mukund Bhalerao

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ค. 2021
  • तुळशीमाळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला
    जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
    पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला..
    Audio Credits :
    Singer: Ajay Gogawale
    Voice Over: Atul Gogawale
    Music: Nitin Ugalmugale, Prasad Shinde
    Lyrics: Mukund Bhalerao
    Music Arrangements And Flute: Ankush A. Boradkar
    Rhythm Arranger: Sachin Bhangre
    Rhythm Player: Sachin Bhangre, Vishal Khot, Karan Patil, Ratnadeep Jamsandekar, Tushar Rankhambe, Karan Kadam, Rasik Thakur
    Chorus: Prasad Shinde, Gopal Thakre, Nitin Ugalmugale, Ankush A.Bordkar, Mukund Bhalerao
    Vocals Recorded By: Pramod Chandorkar at Soundideaz Studio
    Rhythm Recorded By: Avdhoot Wadkar at Ajivasan Sounds
    Mix and Mastered By: Vijay Dayal at Yashraj Studios
    Video Credits :
    Cast: Shashank Shende, Sujata Mogal
    Produced by: PS Music Production
    Co-Produced by: Baba Thombre, Pallab Pratap Bhore
    Song Concept: Nitten Gurjal
    Director: Prashant Pandekar
    Asst. Director: Vishal Sangle, Sangeeta Tiwari
    Cinematography: Sopaan Purandare, Aaditya Kamodkar
    Make-up: Pushkar Deogaonkar
    Costume: Shriya Bhide
    Focus Puller: Omkar Santras
    Drone Pilot: Aaditya Kamodkar, Hrishikesh Katkar
    Making: Jatin Kikale
    Stock Courtesy: Dnyaneshwar Katkade, Dipesh Vaity, Abhay Kevat
    Lights: Siddhivinayak Cine Lights
    Edit: Ashay Deshpande
    DI: Bhushan Sahasrabudhe
    Locations: Prati-Pandharpur (Dudhivare), Dehugoan, Pandharpur
    Photograph courtesy: Mahesh Lonkar
    Posters By: Posterwood Design
    Special Guidance:
    Ajay Gogawale, Atul Gogawale, Pinakin Tendulkar, Nanu Jaisinghani.
    Special Thanks:
    Deva Patil, Vivek Pandit, Prithviraj Murhe, Alkatai Ganesh Dhaniwale, Santosh Kumbhar, Sukhdev Thakar, Datta Shinde, Rajaram Aaswale, Pavan lonkar
    Music on - Video Palace
    Listen to this song on :
    Saavn -
    www.jiosaavn.com/song/maai-ba...
    Gaana -
    gaana.com/song/maai-bappa-vit...
    Wynk -
    open.wynk.in/jyYlkeB2Uhb
    Amazon Music -
    www.amazon.de/s/ref=nb_sb_noss...
    Spotify -
    open.spotify.com/album/1ULMYMg...
    itunes -
    / maai-bappa-vithala-single
    Set 'Maai Bappa Vithala' song as your Mobile Callertune (India Only)
    Airtel Subscribers Dial 5432117761209
    Vodafone Subscribers SMS CT 12583273 to 56789
    Idea Subscribers Dial 5678912583273
    BSNL (South / East) Subscribers SMS BT 12583273 To 56700
    Lyrics :
    तुळशीमाळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला
    जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
    घरातच कारावास सोसला रं रातंदीस,
    तुझा मानुनिया कौल नाही ओलांडली येस...
    गोड लागंना शिवार गोड लागंना रं शेत,
    चंद्रभागेच्या तीराची आम्हा बोलावते रेत,
    तुझ्या नावावीण नसे काही ठाव विठ्ठला,
    जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
    पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला…
    पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला...
    युगे अठ्ठावीस होती तुझी वारी ही अखंड,
    काय झाला अपराध, झाला लेकरांसी दंड,
    कर सावट हे दूर जनामना दे उभारी,
    यंदा तरी लेकरांना घडो पंढरीची वारी,
    कसा भरलासा रागे आता पाव विठ्ठला,
    जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
    पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला…
    पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला...
    बघ जरा माऊली गं तुझ्या बाळांची आबाळ,
    तुझ्या विटे खाली देवा माझी पुरलीया नाळ...
    साहवेना गा विठाई दहा दिशांचा तुरुंग,
    वाळवंटी वाटभर पुन्हा घुमू दे मृदुंग...
    थांबवी रे जीवघेणा लपंडाव विठ्ठला
    जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
    कशी उघड्या डोळ्यांनी तुझी आबाळ पाहीन
    सांग कसा आरामात बाळा वैकुंठी राहीन..
    आता सोडून पंढरी ठायी ठायी मी असतो,
    बघ तुझा जनार्दन आता जनांत वसतो..
    तू संकटात असता कसा बसेन मी स्वस्थ ?
    सांग रोज रस्त्यातून कोण घालतो रे गस्त
    दवाखान्यांतून करी कोण धावाधाव खास...
    कोण बांधतो रे आस, कोण पुरवितो श्वास...?
    लीला तुझ्या सावळ्याची तुला ठेवले डांबून
    की हे काळाचे सावट जावे निघून लांबून...
    पिला माझ्या काही काळ आता घरट्यात रहा,
    कलीकाळाचे संकट कसे निवारतो पहा...
    पदोपदी रे तोवर तुझी काळजी वाहीन...
    साथीत या साथ द्याया बघ इथेच राहीन...
    सारे निवारून मग पंढरीस मी जाईन...
    बाळा, चंद्रभागेतीरी तुझी वाट मी पाहीन....
    पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला…
    पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला...
    Enjoy & Stay Connected with us
    Like us on Facebook : / videopalacemovies
    Subscribe us on TH-cam : th-cam.com/users/subscription_c...
  • เพลง

ความคิดเห็น • 1.2K

  • @rupeshkumavat4183
    @rupeshkumavat4183 7 วันที่ผ่านมา +9

    मनातील दु:ख, वेदना आणि अत्यानंद अश्रूंच्या स्वरुपात डोळ्यांतून बाहेर येनार गाणे आहे खरच.
    अतुलनीय, अप्रतीम.❤

  • @akankshadandwate
    @akankshadandwate 2 ปีที่แล้ว +55

    कित्तेक वेळा ऐकलं तरी प्रत्येक वेळी डोळ्यांत पाणी येतंच, मन भरून येतं 😭 शब्दात व्यक्त करता येणार नाही इतकी मनात कालवाकालव होते. खरंच आता तरी हा जीवघेणा लपंडाव माऊलींनी थांबवावा असं वाटतंय 😭😭🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @rajaramghagas1607
    @rajaramghagas1607 ปีที่แล้ว +1031

    मी एक मुसलमान आहे , पण मी हा गीत दिवसातून 4 5 वेळा रोज ऐकतो, खरच मन भारावून जातय, धन्यवाद 🙏अजय अतुल सर

    • @sagarpawar8348
      @sagarpawar8348 ปีที่แล้ว +31

      Nice

    • @shashikantpujari9627
      @shashikantpujari9627 ปีที่แล้ว +19

      Sàbkà Malik ék

    • @abhitarange7680
      @abhitarange7680 ปีที่แล้ว +8

      खुपचं छान

    • @satishpatil9325
      @satishpatil9325 ปีที่แล้ว +13

      Hich tar ti odh ahe bhau ji valya la valmiki banavate Ani Ramaya lihnya karata pravut karate.

    • @BattleKinG007
      @BattleKinG007 ปีที่แล้ว +63

      Tuj nav tar rajaram aahe mang musalman kasa aahes

  • @premalokafans4962
    @premalokafans4962 9 หลายเดือนก่อน +8

    Ram krishna hari mauli 🙏🙏🙏mi vittalacha ek mottta bhakta

  • @vaibhavagale6596
    @vaibhavagale6596 2 ปีที่แล้ว +53

    ❤️❤️ खूप छान गाणे आहे 🙏🏻🥰
    गेल्या 2 वर्षात खूप काही गमावले सर्वांनी ...मी जगेल कि नाही म्हणणारा माणुस आज परत मानुसकी सोडून पैश्यांच्या मागे लागलाय आणि भेदभाव करतोय 😕
    भेदभाव करू नका माणुसकी जपा 🙏🏻

    • @avkumare
      @avkumare 11 หลายเดือนก่อน

      खरेच...... शेवटी माणूसच..!
      कधीच नाही बदलणार... फक्त पैसा पैसा, जात पात धर्मात गुंतून राहणार!

  • @ErSK-d9s
    @ErSK-d9s 10 หลายเดือนก่อน +17

    ಏನು ಹಾಡಿದ್ದೀಯ ಗುರುವೇ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ಬರ್ತಿದೆ 🙏🙏🙏

  • @ankitjadhav4404
    @ankitjadhav4404 2 ปีที่แล้ว +46

    माय मराठी 🙏🚩❤️....... महाराष्ट्राचे गड किल्ले ,वारीची परंपरा कधीच संपू नये

  • @firozshaikh2103
    @firozshaikh2103 ปีที่แล้ว +59

    Mai bhi Ek Musalman Hoon Mai Roj morning mein ye bhajan sunta hun dil ko bahut sukun Milta Hai Hum Sab Ek Hai Ram Krishna Hari Jay Hari Vithala Om Sai Ram🙏🌹 Jay Hind Jay Bharat Jay Maharashtra

  • @vishnukhursule3795
    @vishnukhursule3795 2 ปีที่แล้ว +42

    ♥️🚩पांडुरंग तुझ्या चरणी प्रार्थना करतो की खुप दिवसा पासून तुझ्या लेकराचे जे हाल चालत ते जरा पहा जरा धावघे पांडुरंग हीच तुझ्या चरणी प्रार्थना पांडुरंग ♥️🚩

  • @rahulbhoye3281
    @rahulbhoye3281 2 ปีที่แล้ว +41

    मनाला लागे डोळ्यात पाणी येई पर्यंत गाणं ऐकल 👌🥺😊♥️

  • @rahuludande3723
    @rahuludande3723 3 หลายเดือนก่อน +2

    अजय दादा आणि अतुल दादा यांची गाणी कायम काळजात घर करून बसली आहेत ❤

  • @user-ut2xt5kd6w
    @user-ut2xt5kd6w หลายเดือนก่อน +4

    श्री रंगा विठ्ठला. 🙏. गाणं तर अप्रतिम आहे महाराष्ट्राची शान आहेत अजय अतुल सर यांची गाणी. काही तरी नवीन. शिकवून जातात. हे विठ्ठला तूझ्याच चरणी माझे प्राण आहे .......🙏🙇

  • @sanvipatil4006
    @sanvipatil4006 2 ปีที่แล้ว +52

    ಭಾಷೆ ಬರದೆ ಇದ್ರೂ ಈ ಹಾಡು ❤ಮನಸ್ಸಿಗೆ ಭಾಳ ಇಷ್ಟ ಆತು❤❤ವಿಠ್ಠಲ ವಿಠ್ಠಲ

  • @dnyanesh790
    @dnyanesh790 2 ปีที่แล้ว +6

    अजय अतुल सर साक्षात सरस्वतीच आहे जी आपल्या मुखातून गाऊन घेत आहे। गाणं थेट काळजाला भिडून अंतरात्मा व्यापून टाकते । आणि जीव कासावीस होतो भेटीसाठी आतुर होतो मग ते विठू माऊली असो की सद्गुरू सर्व एकच । क्षणात अश्रू धारा वाहतात व नजर त्या पांडुरंगाचे दर्शनासाठी व्यथित होतात। गाण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वाना हृदयपूर्वक मानाचा मुजरा 👍👌👌💐

  • @divyankasawant576
    @divyankasawant576 2 ปีที่แล้ว +62

    अंगावर काटा आला. अप्रतिम, शब्दांचा खेळ त्याला मिळालेली संगीताची गोड साथ. साक्षात पंढरीला गेल्याचा भासच.❤️

    • @harishphadtare6606
      @harishphadtare6606 2 ปีที่แล้ว

      0raràatrr00000000 q0⁴aaaGS!!]0

    • @akashbelavane4142
      @akashbelavane4142 2 ปีที่แล้ว

      ययमयं मय्यपन ययमयं मय्यपन म ययमयं मममज मत तममजत ययमयं त

    • @shitalbadakh4977
      @shitalbadakh4977 ปีที่แล้ว

      S right

  • @rajupawar4743
    @rajupawar4743 3 ปีที่แล้ว +113

    माझा विठ्ठला आठवन फार येते मी वारकरी नाही फ्कत एकदाची भेट जिव्हा वेड झाला आंदा 2 वषॉ ची भेट न होता जीव कासावीस झाला रे विठु राया मन रडतय अश्रु वाहतय पण काय करनार ?

  • @sagardive713
    @sagardive713 2 ปีที่แล้ว +51

    1नंबर गाणं आहे अगदी हृदयात शब्द निघतात

  • @akshaythakare1812
    @akshaythakare1812 2 ปีที่แล้ว +26

    शब्दच नाही आपल्याकडे ❤️अप्रतिम 👍

  • @sunitazende2423
    @sunitazende2423 2 ปีที่แล้ว +7

    मन शांत होत... हे गाण ऐकलं कि... 🌺🙏🏻
    ।।माय माऊली।।🌺🙏🏻🙏🏻

  • @user-eg6nv1tg8k
    @user-eg6nv1tg8k 4 หลายเดือนก่อน +2

    किती वेळा पण गाणं ऐकलं तर मन भरत नाही गाणं खुप सुंदर हा है😭😭

  • @Shetkrisamrudhimishan
    @Shetkrisamrudhimishan 2 ปีที่แล้ว +82

    आवाजात किती करुणाभाव आहे, किती आत्मियतेने गायन केले आहे, खूपच अप्रतिम,
    मी रोज पहाटे एकदा मनापासून हे गाणं ऐकतो आहे, दिवस भर मन अगदी प्रसन्न रहातं,व ओठांवर शब्द रहातात,
    पांडुरंगा विठ्ठला, मायबापा विठ्ठला.
    गायकाला मनापासून धन्यवाद,🙏

    • @sandeepbinnar7914
      @sandeepbinnar7914 ปีที่แล้ว

      Mi pn darRoj pahate aikato bhau....khuuupp bar vatat jevha. Panduranga vitthala may bapa vitthala he shabd kani yeta tevha....realy heart touching song

    • @prashantkale589
      @prashantkale589 ปีที่แล้ว

      Correct

    • @parasaramnavale6463
      @parasaramnavale6463 ปีที่แล้ว

      धन्यवाद मनापासून. अजय .अतुल. पांडुरंगा विठठला मायबापा विठठला. मन भरून येतं.

  • @minetejas4300
    @minetejas4300 2 ปีที่แล้ว +33

    देवा किती परीक्षा घेणार अजुन थांबव रे त्रास 😪

  • @ksharvsnl
    @ksharvsnl 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम ... एवढेच म्हणू शकतो .. बाकी भावना व्यक्त करायला शब्द नाहीत आणि काही बोलावे अथवा लिहावे - तर किती आणि कसे लिहावे हा प्रश्न पडतो.. आम्ही सर्व श्रोते आपले सदैव ऋणी राहू.. व हे ऋण कमी न होता सदैव वाढतच जावे ही श्री विठ्ठला चरणी प्रार्थना ..

  • @jalindarkale3917
    @jalindarkale3917 2 ปีที่แล้ว +26

    अप्रतीम गाण डोळ्यातून अश्रू अनावर झाले माझे ॥ राम कृष्ण हरी ॥

  • @incometaxreturns9568
    @incometaxreturns9568 2 ปีที่แล้ว +54

    अप्रतिम रचना ❤️
    " चंद्रभागे तीरी तुझी वाट मी पाहीन " ऐकल्यावर ओढ लागली पंढरीची 🙏

  • @MefromU09
    @MefromU09 3 ปีที่แล้ว +99

    अजय-अतुल, The Gem of महाराष्ट्र... ❤️

  • @rohittakale2031
    @rohittakale2031 ปีที่แล้ว +5

    आपण ज्या काळातून आज हे दिवस पाहतो आहे आणि प्रशासन विठ्ठल रुपी आपली काळजी घेत होत भविष्यात पुढच्या पिढीला हे गाणं बघितलं कीवा एकल तरी महामारीच्या लाटा म्हणजे काय ते हे गाणं सगळं दाखवून देईल.

  • @SandeepPatil-ui6xm
    @SandeepPatil-ui6xm 2 ปีที่แล้ว +16

    किती वेळा पण गाणं ऐकलं तर मन भरत नाही सतत ऐकावं वाटते... खुप छान गाणं आहे.. खुप छान गाणं आहे.. खुप छान गाणं आहे..

  • @uttamsupnekar6351
    @uttamsupnekar6351 2 ปีที่แล้ว +24

    जय हरी अजय अतुल सर यांना पांडुरंगाची सेवा करण्यासाठी च धरतीवरती पाठवले असावे किती वेळा गीत
    ऐकले तरीही मणाची भुक भागत नाही सर काय तुमच्या आवाजात ताकद
    आहे शेवट तर
    अप्रतिम धन्यवाद सर

    • @bhaveshingale65
      @bhaveshingale65 2 ปีที่แล้ว

      खरंच भावा 🥺❤️

  • @prasadpatil539
    @prasadpatil539 2 ปีที่แล้ว +91

    अप्रतिम गाणं आहे, खरोखर डोळ्यात पाणी आलं......... धन्यवाद अजय - अतुल सर 😍😍

  • @rakeshpawar3274
    @rakeshpawar3274 2 ปีที่แล้ว +52

    अजय आणि अतुल सर तुम्हाला सलाम आहे खरच खूप सुंदर गाणं आहे❤️😍🙏🚩....राम कृष्ण हरी माऊली❤️🚩🙏

  • @archnadeshmukhjabalpurcity2729
    @archnadeshmukhjabalpurcity2729 15 วันที่ผ่านมา +1

    किती सुंदर हे गीत😢😢
    मन दाटून आलय दादा....😢किसी सुंदर गयालय तुम्ही खूप सुरेख दादा

  • @Sandysot151
    @Sandysot151 2 ปีที่แล้ว +10

    पांडुरंग हरी💐💐💐💐हृदयाला स्पृश केलात सर💐💐💐💐

  • @sirajshaikh2303
    @sirajshaikh2303 ปีที่แล้ว +6

    महाराष्ट्राची संस्कृती

  • @user-rr6ty3ke7z
    @user-rr6ty3ke7z 22 วันที่ผ่านมา +1

    काय तो आवाज काय ते गाण्याचे कडवे.....मानले राव अजय अतुल तुम्हाला.... खरच डोळ्यात पाणी आले ❤️‍🩹❤️

  • @user-nt3ll3he5o
    @user-nt3ll3he5o ปีที่แล้ว +1

    Mala khup avdla ha sang 🥹🙏🏻
    अंगावर काटे। येतात 🙏🏻

  • @akshaymane5871
    @akshaymane5871 2 ปีที่แล้ว +5

    अजय अतुल यांची शब्द रचना कुणाला ही जमणार नाही या आयुष्यात तरी अप्रतिम ♥️♥️♥️

  • @sujatamore5142
    @sujatamore5142 2 ปีที่แล้ว +21

    खूप सुंदर .... यातून खरोखर मनातील भावना व्यक्त होतात..

  • @harishdeshmukh7120
    @harishdeshmukh7120 5 หลายเดือนก่อน +1

    हीच जादू आहे अजय सर यांच्या आवाजात किती पण नास्तिक असणारा माणूस ह्या आवाजाने विठ्ठला च्या भक्तीत तल्लीन होतो. हा आवाज नास्तिक मानवाला पण आस्तिक होण्यास भाग पडतो.. 🙏🏻🙏🏻

  • @ashwinipuri9788
    @ashwinipuri9788 ปีที่แล้ว +4

    डोळ्यातलै अश्रु आवरले नाहीत ऐकुन खुप छान सर👌👌👌🙏🙏🙏खुपचं गोड आवाज. खुप छान वाटलं ऐकुन

  • @swarashirke6789
    @swarashirke6789 ปีที่แล้ว +5

    खूपच छान गाण्याची रचना केली आहे आणि गायले पण खूपच छान...काळजाला लागून गेले हे गाणं ....hats off..

  • @vidhivideshjadhav2821
    @vidhivideshjadhav2821 2 ปีที่แล้ว +7

    हे गाणं ऐकताना डोळ्यातून पाणी येत हृदय स्पर्शी आहे हे गाणं मी दिवसात जस वेळ भेटतो तास गाणं एकते

  • @ganpatshinde4727
    @ganpatshinde4727 2 ปีที่แล้ว +5

    गाणं ऐकतांना प्रत्यक्षात विठ्ठलाच्या सानिध्यात असल्याचा भास होतो,,,
    अंगावर शहारे येतात,
    खरंच खूप अप्रतिम शब्द आणि सूर,,,,,

  • @prabhakarchimagave8300
    @prabhakarchimagave8300 ปีที่แล้ว +16

    भक्ताने घातलेली आर्त हाक...... आणि त्याप्रमाणे देवाने ही दिलेली. भावपूर्ण साद..... अप्रतिम......

  • @balasahebgaikwad980
    @balasahebgaikwad980 2 ปีที่แล้ว +22

    Kharach Kaljala lagnare shabad ahet hy ganyat Great Ajay Atul Sir 👌❤️😊🤗

  • @vikasbandawane1077
    @vikasbandawane1077 2 ปีที่แล้ว +55

    Today I am in pandharpur and I travel in bike pune to pandharpur and all road I only listening 🎧🎧 this song
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    पांडुरंगा विठ्ठला मायबापा विठ्ठला

  • @jalindarpatil3025
    @jalindarpatil3025 ปีที่แล้ว +4

    मी दररोज एक वेळा तरी हे गाणं एकतोच... खूपच छान, अप्रतिम रचना, आणि संगीत पण, अजय अतुल जोडी great...👍
    God bless you,

  • @vajirpashanadaf6954
    @vajirpashanadaf6954 ปีที่แล้ว +6

    हे गान आइकुन मानुस शांतपने भाराहुन् जातो very nice Atul sir..❤️🌏🤲🙏✌️✌️✌️

  • @hemantatkari6409
    @hemantatkari6409 2 ปีที่แล้ว +15

    🚩🙏पांडुरंग आणि वारकऱ्यामधील एक अतूट नात दाखवणार गान आहे हे 🚩🙏

  • @suryakantghadi
    @suryakantghadi 9 หลายเดือนก่อน +3

    अतुल च्या आवाजातल्या ओळी अशक्य आहेत.. थेट काळजाचा ठाव आणि डोळ्यात पाणी.. अजरामर गीत..

  • @dipaliyadav9536
    @dipaliyadav9536 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    विठ्ठलाची लीला अपरंपार आहे🙏🙏💐💐 विट्ठल, विट्ठल,जय हरी विठ्ठल ❤️❤️

  • @rohantelavane654
    @rohantelavane654 ปีที่แล้ว +2

    अविस्मणीय ! आप्रतीम शब्दच नाही. मन तृप्त झालं.. काय ती रचना.. वारकरी डोळ्याचा समोर आले.. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल // राम कृष्ण हरी //

  • @subhashghalke9621
    @subhashghalke9621 2 ปีที่แล้ว +11

    अप्रतिम रचना,,आणि आवाज तर काय ,,,आहाहा

  • @jotibaagastya3330
    @jotibaagastya3330 2 ปีที่แล้ว +50

    This song is inspired me to go Pandharpur by walk , i have got 4 day off for diwali(Nov 2021) and i decid to go pandharpur , i have not prepared physically but god vitthal has given strength to complete my journey from Pune to Pandharpur i have completed 204 km in 5 day , it was my great experience and solo walk first time . Every movement and every day is challenging . God bless to you all .

  • @praveenoffice5868
    @praveenoffice5868 3 หลายเดือนก่อน +2

    ఇది చాలా చక్కని పాట
    గత 2 సంవత్సరాలలో అందరూ చాలా కోల్పోయారు...నేను బతుకుతాను లేదా అని అన్న మనిషి ఈరోజు డబ్బు వెనుక మానవత్వాన్ని వదిలి వివక్ష చూపుతున్నాడు.
    వివక్ష చూపవద్దు మానవత్వాన్ని కాపాడండి

  • @dilipmarnar2141
    @dilipmarnar2141 2 ปีที่แล้ว +28

    मावली।तूमचा।गानयाचा।आवाजातून।मि।माजा।विठल।पहातो

  • @dnyaneshwarpatil9812
    @dnyaneshwarpatil9812 2 ปีที่แล้ว +48

    अप्रतिम शब्द,संगीत,आवाज.

  • @user-mt6gr9eq9k
    @user-mt6gr9eq9k 2 ปีที่แล้ว +39

    माऊलींचं गाणं ऐकून खूप भरून आले...😭!! राम कृष्ण हरी !!🙏🙏🚩

  • @geetagadkar7055
    @geetagadkar7055 ปีที่แล้ว

    खरच खूप सुंदर आहे हे गाण.हे गाणं आईकले का kup chan vate.manat Ghar karun jate ..Khup kahe गमावले माणसांनी .आपलीच माणसं आल्याला पासून लाब झाले ..

  • @shivrajcollection
    @shivrajcollection 2 ปีที่แล้ว +63

    मी आजपर्यंत कुठलेही गाणं एवढ ऐकलं नसेल तेवढया वेळा हे गाणं ऐकलं आहे दररोज हे गाणं 4-5 वेळा हे गाणं आजही ऐकतोय

  • @ranjitmahadik7146
    @ranjitmahadik7146 2 ปีที่แล้ว +47

    आज पर्यंत 100 वेला गाणं ऐकलं खूप भारी आहे

  • @vikasmarathe7096
    @vikasmarathe7096 2 ปีที่แล้ว +24

    या संपूर्ण टीम ला ज्यांनी हे सुंदर गाणं तयार केलं साष्टांग दंडवत, गाणं ऐकत असताना जणु काही आपण स्वर्गात असल्याचा भास होतो, आणि बस लगेचच पांडुरंगाची भेट होईल हा आभास होतो.....

    • @amitjohnsmith7904
      @amitjohnsmith7904 ปีที่แล้ว

      खुप अप्रतिम गाणे आहे........

  • @chhayagadekar1661
    @chhayagadekar1661 5 หลายเดือนก่อน

    प्रत्येक वेळी हे गीत ऐकल की काय व्यक्त व्हाव शब्द सुचत नाही.आणी गाण्याच्या प्रत्येक शब्दाला मला माझे बाबा आठवतात😢😢

  • @kshitija215
    @kshitija215 ปีที่แล้ว +2

    माझ्या आजोबांना covid झाल्यामुळे ही परिस्थिती खूप जवळून अनुभवली... खरंच हे एक भयानक सत्य आहे.. ऐकताना मिटलेले डोळेही आपोआप पाणावले..😢 hat's off Sir 🙏🙏

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 2 ปีที่แล้ว +33

    मन भरून आले,धन्यवाद अजय - अतुल गायक संगीतकार.

  • @vaibhavsagar6065
    @vaibhavsagar6065 2 ปีที่แล้ว +6

    आम्ही रोज सकाळी ऐकतो

  • @hritikpatil4300
    @hritikpatil4300 2 ปีที่แล้ว +8

    किती छान गाणं गायलं आहे अप्रतिम अजय-अतुल यांनी 🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌👌

  • @adwaitgodse8091
    @adwaitgodse8091 2 ปีที่แล้ว +6

    Just writing down what struck me first listening to this song:
    Very good music arrangement by Ankush.
    Nitin- Prasad's Music straight from Ajay - Atul school of music.
    Lyrically a treat by Mukund Bhalerao.
    Voices of Ajay Gogavale and Atul Gogavale.
    And
    Above all Shashank Shende's Expressions... ह्या माणसाने प्रत्येक महाराष्ट्रवासियांच्या, अनेकानेक कर्नाटकी, आंध्र, तेलंगणा बांधवांच्या मध्ये वसलेला वारकरी...खरेतर भाषा,जात - पंथ, धर्म, प्रांत, राज्य, देश ओलांडून जय हरी विठ्ठल नाद करणाऱ्या समस्त " विठ्ठलप्रेमी" मंडळींच्या अंतर्यामी वसलेला वारकरी आणि त्याची घालमेल जीवंत उभी केली आहे...

  • @suhaskale1334
    @suhaskale1334 2 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम गाणं आहे. शब्द च नाही अजय अतुल सर तुमच्या साठी एकदम सुंदर चाल.. खुप खुप सुंदर गायन 👏🏻👏🏻

    • @dipalitayade3661
      @dipalitayade3661 2 ปีที่แล้ว

      अप्रतिम,, 🙏🙏भावाविभोर झालं,, भक्ताचा कळवळा भरभरून आहे,,

  • @rohanchoudhari5234
    @rohanchoudhari5234 2 ปีที่แล้ว +348

    बास झालं आता देवा.. हे सगळ संपूदे. पुन्हा पाहिल्यासारखं सगळ काही सुरळीत होऊदे. विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन शिक्षण घेऊदे. वारकऱ्यांना तुझ्या पंढरीत गजबजुदे. नवीन पिढीला तरुणांना रोजगार मिळू दे. उद्योग व्यवसायाला चालना येऊदे. सर्वांना सुखी आनंदी होऊदे 🙏🙏🙏🙏🙏

    • @pruthvichavan4858
      @pruthvichavan4858 2 ปีที่แล้ว +6

      😥😥😥😥

    • @komalkokil7179
      @komalkokil7179 2 ปีที่แล้ว +3

      Yyfuu

    • @xyz5480
      @xyz5480 2 ปีที่แล้ว +10

      सर्वांची चिंता करणारी लोकं खरंच खूप कमी आहेत, रोहन फार छान विचार आहेत आपले. 👌🏻

    • @MrParshuramchoudhari
      @MrParshuramchoudhari 2 ปีที่แล้ว +1

      👍👌👌

    • @mayurkadgaonkar8933
      @mayurkadgaonkar8933 2 ปีที่แล้ว +4

      खूप सुंदर विचार आहेत आपले sir

  • @ganeshzingade5559
    @ganeshzingade5559 ปีที่แล้ว +16

    महाराष्ट्राची शान अजय अतुल सर.....❤❤

  • @rshamadagale9794
    @rshamadagale9794 2 ปีที่แล้ว +10

    Ek no awaz ahe lvkrch jaude hi mahamari🙏

  • @nishantbabbar2908
    @nishantbabbar2908 ปีที่แล้ว +24

    महाराष्ट्र की संस्कृत को जागृत रखने के लिए अतुल अजय आपका धन्यवाद हमारे विट्ठल भगवान का यह भजन सुनकर हमारी आंखों में पानी ए गया😢😢😢😢🙏🙏

  • @azharpinjari746
    @azharpinjari746 2 ปีที่แล้ว +22

    जीवनाचा अर्थ सगळा विठल

  • @SaiCreation24
    @SaiCreation24 4 วันที่ผ่านมา +1

    अंगावर काटा आला हे गाण ऐकून ❤🙏

  • @BabanGanganbeedkar
    @BabanGanganbeedkar 2 ปีที่แล้ว +2

    खरंच अप्रतिम गाणे आहे; गाण्यातील शेवटच्या ओळी ऐकून अंगावर काटा उभा राहतो;. मन भरून आले. मन हरवुन गेल..पांडुरंगा विठ्ठला. मायबापा विठ्ठला…

  • @sumedhbagade9731
    @sumedhbagade9731 2 ปีที่แล้ว +6

    Kay bhari song aahe👌 100 da aael yar mi khup ch mst aahe ajay atul dada kay voice aahe 🙏

  • @deepakhangirgekar6695
    @deepakhangirgekar6695 2 ปีที่แล้ว +7

    Khup chan song aiklyavar dolyatil asru thabenase jhale atta pryant mi 100 vela aikla song khup chan heart touching

    • @subhashkadam5190
      @subhashkadam5190 2 ปีที่แล้ว +1

      खूपच मस्त आहे गाणं

  • @swapnilkhochare5340
    @swapnilkhochare5340 2 ปีที่แล้ว +2

    आई मुलाला कधी सोडत नाही तस आपला मायबाप आपल्या कसा सोडलं आयुष्यात काही नसताना मला त्यांनीच सावरले मायबापा विठ्ठला 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤❤️❤❤️❤👌🙏👌

  • @akshaywagh94
    @akshaywagh94 2 ปีที่แล้ว +8

    तुळशीमाळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला!!
    जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला!!😭🙏
    अजय अतुल ❤️🙏

  • @ss-ml6zu
    @ss-ml6zu 2 ปีที่แล้ว +6

    नादच करायचा नाय किती वेळा ऐकल तरी ऐकू वाटत😊😊

  • @urmilanigal2308
    @urmilanigal2308 2 ปีที่แล้ว +23

    शब्द न शब्द इतका सुंदर आहे ऐकून मनाला खुप छान वाटत हे गाणं अप्रतिम लिहून ते सादर करणार्या सर्वांचे मनापासून आभार ☺🙏🙏💓💝

  • @shanayathakur3913
    @shanayathakur3913 ปีที่แล้ว +1

    Ajay Atul sir khup khup dhanyawad ashi gaani banavanya sathi eka eka shabda la radu yett aani mala majhya pappanchi khup aathawan yete tyanch hi naav vitthal hott 😢😢

  • @shambalanikalje3260
    @shambalanikalje3260 2 ปีที่แล้ว +5

    खुप छान गान आहे कीतीवेळा आईल तरी पण आईका वाटत सारख

  • @pratibhaahirraoahirrao947
    @pratibhaahirraoahirrao947 4 หลายเดือนก่อน +3

    मन शांत होते हे देवाचे गाणं ऐकलं की

  • @prajaktakhambete2316
    @prajaktakhambete2316 2 ปีที่แล้ว +18

    खूपच सुंदर गाणं..
    स्वर्गीय सुर.. काळजाला भिडतात ❤️

  • @suniljogi4402
    @suniljogi4402 4 หลายเดือนก่อน +1

    अतिसुंदर विठ्ठलाचं गाणं आहे खूप छान❤❤❤❤❤

  • @mahadevpawar1987
    @mahadevpawar1987 2 ปีที่แล้ว +250

    सलाम अजय अतुल डोळ्यात पाणी आले खरंच देवा लवकर ही दूर कर ही महामारी

  • @harishwaghat1987
    @harishwaghat1987 2 ปีที่แล้ว +74

    मन हरवुन गेल... Nice song 👌..
    Heart touching ♥️..

  • @pankajpatil7603
    @pankajpatil7603 2 ปีที่แล้ว +47

    Incredible Song ......Such a Heart Touching💓💓

  • @mrvaishnavpatil757
    @mrvaishnavpatil757 2 ปีที่แล้ว +2

    या गाण्यात आपली मनाची व्यथा आहे आणि हे गाणं आईकल की मनाला नवीन ऊर्जा निर्माण होते. जगात देव आहे हे समजते.
    माऊली सर्वांची इच्छा पूर्ण होवो.
    || जय हरी विठ्ठल ||

  • @suniljogi4402
    @suniljogi4402 4 หลายเดือนก่อน +1

    विठ्ठलाचे खूप छान भजन आहे मन भरून आलं खूप छान❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @JayShriRam7448
    @JayShriRam7448 2 ปีที่แล้ว +21

    While searching for gold we lost the diamond (Marathi song) 💎❤️what a song .........🚩

  • @pratishthachopdekar6057
    @pratishthachopdekar6057 2 ปีที่แล้ว +7

    सुंदर‌ काव्यरचना,अप्रतिम आवाज आणि याला मिळालेली संगीताची जोड ...वारकरी व भाविक हे भक्तिमय गीत ऐकून भावुक होतील .... || राम कृष्ण हरी || 🙏🙏

  • @singersaurabhsinghal8055
    @singersaurabhsinghal8055 ปีที่แล้ว +2

    Bhai Sahab mujhe marathi aati nahi ...lekin mere krishna k liye apne itne bhav se bhajan gaaya h ye jitna b baar sunu esa lgta h ek bar or 👌👌😊😊
    Vittal ji apko humesa khus rkkhe
    Jai shree shyam ji 🙏🙏

  • @lakhanwaghpatil6917
    @lakhanwaghpatil6917 2 ปีที่แล้ว

    हे गाणं ऐकल्या पासून धावपळीच्या जीवनात जगण्याचा आणि नोकरी करण्याचा कंटाळा आलाय , आता अस बिलकुल वाटतंय की त्या विठुरायाच्या नावानं आणि माय बापासाठी उर्वरित जीवन जगावं
    बालपण पासून ते तारुण्य परेंत शिक्षण
    , नंतर कर्जबाजारी आणि अठ्रविश्र्व दारिद्र्य , आणिनंतर नोकरी लागते त्याच नोकरी चा नादात
    समाजसेवा , मायबाप सेवा विठुरायची सेवा विसरलो ओ

  • @TheLegend-cn5ts
    @TheLegend-cn5ts หลายเดือนก่อน +18

    मुस्लिम आहे तर काय झाले आपण सर्व जण एकच आहोत....

  • @Onlinearnwithmebhai
    @Onlinearnwithmebhai 2 ปีที่แล้ว +3

    शब्द नाहीत माझ्याकडे.. कोणत्याही धर्माचा कोणत्याही भाषेचा माणूस या गाण्याच्या प्रेमात पडेल हो... भान विसरून जाते हे गाण एकूण.. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @theartofgold9859
    @theartofgold9859 2 ปีที่แล้ว +1

    Ajay sai tumcha avach yekla ki kharch man prasann zal ...

  • @vinitaatandale9168
    @vinitaatandale9168 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर खरंच आज प्रत्येकाची हिच भावना आहे 🙏🙏🙏🙏