- 10
- 12 850
Sundeep Gawande Creatives
India
เข้าร่วมเมื่อ 6 เม.ย. 2021
कथा, कविता, गाणी व इतर ललित निर्मिती!
दत्तात्रय जयंती विशेष - मी चालत आहे | संदीप गावंडे | मंदार आपटे
|| मी चालत आहे ||
मी चालत आहे या वाटेवरती
मी चालत राहीन सदा
मी शोधत आहे या वाटेवरती
मी शोधत राहीन तुला || धृ ||
शोधीन निरागस हास्य फुलांत
अन् गंध तुझा शोधीन तयांत
रंग तुझा सांगतील तीच बघ मला ||१||
ठाव तुझा शोधीन या चराचरात
भाव तुझा शोधीन मी मनामनात
गाव तुझा सांगतील द्विज बघ मला ||२||
उब तुझी शोधीन सोनेरी किरणांत
स्नेह तुझा शोधीन शीतल चांदण्यांत
रूप तुझे सांगतील तीच बघ मला ||३||
शोधीन निरामय सौख्य क्षणांत
अन् संग तुझा या ज्ञानपथात
सत्व तुझे दाखविल मार्ग बघ मला ||४||
शोधतांना प्रेम अथांग सागरात
शोधतांना क्षेम हिमगिरीशिखरांत
शोधशील शेवटास तूच बघ मला ||५||
मी चालत आहे या वाटेवरती
मी चालत राहीन सदा
मी शोधत आहे या वाटेवरती
मी शोधत राहीन तुला || धृ ||
शोधीन निरागस हास्य फुलांत
अन् गंध तुझा शोधीन तयांत
रंग तुझा सांगतील तीच बघ मला ||१||
ठाव तुझा शोधीन या चराचरात
भाव तुझा शोधीन मी मनामनात
गाव तुझा सांगतील द्विज बघ मला ||२||
उब तुझी शोधीन सोनेरी किरणांत
स्नेह तुझा शोधीन शीतल चांदण्यांत
रूप तुझे सांगतील तीच बघ मला ||३||
शोधीन निरामय सौख्य क्षणांत
अन् संग तुझा या ज्ञानपथात
सत्व तुझे दाखविल मार्ग बघ मला ||४||
शोधतांना प्रेम अथांग सागरात
शोधतांना क्षेम हिमगिरीशिखरांत
शोधशील शेवटास तूच बघ मला ||५||
มุมมอง: 500
วีดีโอ
ये अशी अगदी समीप | पद्मश्री डॉ. सुरेश वाडकर | मंदार आपटे | सागर साठे | अर्चना गोरे | आनंद डबरे
มุมมอง 1.2K3 หลายเดือนก่อน
मूळ प्रकाशन: स्मृतिगंध मराठी २९ जुलै २०२२. गायक: पद्मश्री डॉ. सुरेश वाडकर संगीत: मंदार आपटे संगीत संयोजन: सागर साठे ध्वनिचित्रमुद्रण: अर्चना गोरे कवितेचे गाणे होतांनाचा हा पहिलावहिला प्रवासानुभव विलक्षण रोचक होता. मंदारच्या सुंदर चालीसाठी आणि हा प्रकल्प तडीस नेण्यात दिलेल्या मोलाच्या सहकार्यासाठी मी त्याचा सदैव आभारी राहीन. तुम्हालाही हे गाणं नक्की आवडेल तेव्हां जरूर ऐका व आपल्या प्रतिक्रिया मल...
Haravun Gele Najaret Tuziya |Marathi Gazal |Sundeep Gawande |Gayatree Gaikwad-Gulhane |Kaustubh Naik
มุมมอง 7275 หลายเดือนก่อน
हरवून गेले नजरेत तुझिया हरले स्वत:ला समवेत तुझिया उरले मला ना ऋतू हे स्वत:चे बहरून येते बहरेत तुझिया तुला पाहण्याचा जडलाय छंद मकरंद टिपते झलकेत तुझिया व्यापून गेला तु अस्तित्व माझे मी शेर झाले गझलेत तुझिया करून एकदाचे साहस कथावे कानी गुपित हे हलकेच तुझिया कवी: संदीप गावंडे संगीतकार आणि गायिका: गायत्री गायकवाड - गुल्हाणे संगीत संयोजन व प्रोग्रामिंग: कौस्तुभ अविनाश नाईक तबला: अनुप राजे पवार की-बो...
Tum Tum(Chham Chham)|Song|Enemy|Vishal,Arya|Anand Shankar|Thaman S|Marathi Lyrics by Sundeep Gawande
มุมมอง 9K5 หลายเดือนก่อน
Disclaimer: Audio recreated in Marathi purely for entertainment purpose. अस्वीकरण: हे गाणं केवळ मनोरंजनासाठी मराठीत पुनर्निमित करण्यात आले आहे. Movie Stills Courtesy: th-cam.com/video/yGUKYKSJJc8/w-d-xo.html 'एनिमी' या मूळ तमिळ चित्रपटातील गाजलेल्या 'टम टम' गाण्याला मराठी रसिंकासाठी शब्दबद्ध करण्याचा एक प्रयत्न. हा मूळ गाण्याचा अनुवाद नव्हे तर गाण्यातील भाव बघून स्फुरलेले नवीन शब्द आहेत. आनंद घ...
दृष्टिदान - पंढरीनाथाचार्य गलगली | मराठी अनुवाद - संदीप गावंडे
มุมมอง 456 หลายเดือนก่อน
पंढरीनाथाचार्य गलगली लिखित दृष्टिदान या कन्नड कवितेचा मराठी अनुवाद
जेव्हा मला कळेना | संगीत-गझलगंधर्व सुधाकर कदम | गीत-संदीप गावंडे | गायक-मयूर महाजन
มุมมอง 1427 หลายเดือนก่อน
मूळ प्रकाशन: दि. १५ जून २०२३ यु-ट्युब वाहिनी: गझलगंधर्व सुधाकर कदम. कविता: जेंव्हा मला कळेना तुझिया मनातले ते मी शोधतो पुराने क्षण जीवनातले || ध्रु || तू हाक हाक ओठी तू साद साद कानी मी ऐकलेच नाही, गाणे उरातले ते ||१|| तू वाट वाट प्रहरी तू चाल चाल लहरी मी गाठलेच नाही, घरटे उन्हातले ते ||२|| तू स्पर्श स्पर्श काया तू चिंब चिंब माया मी प्यायलोच नाही, मधुक्षण मधातले ते ||३||
नाम घ्यावे राम घ्यावे | संदीप गावंडे | सचिन गुडे
มุมมอง 1.1K11 หลายเดือนก่อน
प्रदीर्घ संघर्ष आणि प्रतिक्षेनंतर आज बाळ रामाची अयोध्येच्या मंदिरात भव्य समारोहाद्वारे प्रतिष्ठापना झालेली असतांना भक्तिभावाने मन ओतप्रोत आहे. रामचरणी नतमस्तक होऊन या उत्सवात खारीचा वाटा उचलण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न. जय श्रीराम!🙏 गीत व संगीत: संदीप गावंडे, अमरावती संगीत संयोजन: सचिन गुडे, अमरावती गायक: राहुल तायडे, अमरावती छायाचित्रण: अमीन गुडे, अमरावती नाम घ्यावे राम घ्यावे सहज, सुंदर, सा...
मराठी कथा: गाभुळलेली चिंच | लेखक: संदीप गावंडे, अमरावती
มุมมอง 833 ปีที่แล้ว
मराठी कथा: गाभुळलेली चिंच | लेखक: संदीप गावंडे, अमरावती
जात होवो नामशेष
มุมมอง 553 ปีที่แล้ว
कवितेचे शीर्षक: जात होवो नामशेष भाषा: मराठी कवी: संदीप गावंडे, अमरावती