Sai shidori shirdi
Sai shidori shirdi
  • 223
  • 77 727
INDORE SARAFA BAZAAR |FLYING DAHI VADA | ALOO TIKKI | FALOODA | STREET FOOD | 😋🤩😍SAISHIDORI #indore
I
NDORE SARAFA BAZAAR |FLYING DAHI VADA | ALOO TIKKI | FALOODA | STREET FOOD | 😋🤩😍SAISHIDORI #indore
कधी कधी रुटीन ह्या शब्दाचा देखील कंटाळा येतो इतकं ते
चालू असतं. मागच्या आठवड्यापर्यंत आमचा दाल रोटी खाओ प्रभू के गुण गाओ हाच कार्यक्रम चालला होता. अचानक तब्बल 4 दिवसांचा दौरा ठरला. तोदेखील इंदोर, उज्जैन आणि ओंकारेश्वर असा भरगच्च. आता इंदोर म्हणलं की लगेच तुमच्या समोर तिथली खादाडी आली असणार, माझ्या पण आली. आता एक जबाबदारी असते. म्हणजे नुसतच गेलो, खाल्लो आणि परतलो असं जमत नाही. तिथले सुंदर फोटो जमलंच तर व्हिडिओ, पाककृती यांची माहिती घ्यावी लागते आणि आपल्या मैत्रिणींना सांगितल्यावरच खादाडी पूर्ण होते. त्यामुळे मी देखील खादाडी व्यवस्थित प्लॅन केली.
इंदोर म्हणजे खवय्या लोकांच शहर. इथे आवर्जून भेट देण्यासारख्या 2 जागा एक म्हणजे सराफा बाजार आणि दुसरी म्हणजे छप्पन गल्ली! आता ही नावं का पडली ते सांगतो. सराफा बाजार हे खाण्याचं ठिकाण कस काय असू शकतं असा प्रश्न मलाही पडला होता. पण तीच तर गंमत आहे. इथल्या प्रसिद्ध राजवाड्याच्या मागच्या बाजूला सराफा बाजार आहे. हे मार्केट 8.30 ला बंद झालं की इथे एक एक करून आणि एक से एक खाण्याची दुकानं सुरू होतात. म्हणजे त्या सराफाच्या बंद दुकानासमोर. सराफा बाजाराची एकदम खाऊ गल्ली होऊन जाते. म्हणून याला हे नाव. रात्री 1-2 वाजेपर्यंत मग सोहळा चालू असतो. मी इथेच गेलो होतो. काही दुकानं, हातगाड्या जरी 8.30 नंतर सुरू होत असली तरी प्रसिद्ध दुकानं दिवसभर सुरू असतात. त्यापैकीच काही मोजक्या पदार्थांची ही सफर खास खादाड खाऊंसाठी सादर करत आहे...
ठीक 8 वाजता मी सराफा बाजारच्या गल्लीच्या तोंडाला उभा होतो. सगळी ज्ञानद्रिय अनुभवासाठी एकवटली होती. डोक्यात खाण्याशिवाय कुठलेही विचार नव्हते. माझ्यासोबत माझे इंदोरचे मित्र होते. जिंदगी ना मिलेगी दोबारा ह्या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे ते माजलेले वळू कसे फुरफुरतात तसा मी देखील फुरफुरत होतो. बायको मला वेसण घालण्याचा प्रयत्न करत होती. सर्वप्रथम तिथे प्रसिद्ध असलेल्या आणि गल्लीच्या तोंडावरच असलेल्या विजय चाट हाऊस इथे मी धडकलो. कचोरी, ढोकळा हे नेहमीचं खाणं नको असं मित्राने सांगितलं आणि खोपरा पॅटिसची ऑर्डर गेली. अरुंद रस्ता, गर्दी ह्यापैकी कशाचीही पर्वा न करता मी बरोबर पॅटीसचा द्रोण उचलला. अप्रतिम तुम्हाला सांगतो. अहाहा. आतमध्ये खोबऱ्याचा भरपूर किस, चिंचेची आंबटगोड चटणी, हिरवी चटणी असं अफलातून मिश्रण. इतरही पदार्थ आहेत इथे पण हे पॅटिस सोडू नका. एकच पोट असल्यामुळे आणि इतरही पदार्थ खायचे असल्यामुळे फक्त 2च पॅटिस खाऊन जड मनाने पुढे सरकलो.
त्यानंतर गाठला कोकोनट क्रश. शहाळ्यातली मलई, पाणी इतर घटक पदार्थ एकत्र करून हा शेक बनवतात याची जास्त दुकानं नाहीत पण चव छान आहे. कल्पकतेने बनवला आहे हा शेक. भरपूर खोबरं पोटात गेलं होतं त्यामुळे मी पुन्हा माजल्या वळूसारखा फुरफुरायला लागलो.
मग
मग आम्ही मोर्चा वळवला जोशी दहिवड्याकडे. इकडे याला दहीबडा म्हणतात आणि ते खरं देखील आहे. हा वडा खूपच बडा आहे. हा इथला सर्वात प्रसिद्ध आयटम. याच वैशिष्ट्य म्हणजे याचा आकार आणि दह्याची चव. घट्टसर दही, छान गोड चव आणि 5 मसाले यात टाकले जातात. हे मसाले 5 बोटांच्या चिमटीत घेऊन एका विशिष्ट क्रमाने टाकले जातात. हे जोशी काका हे मसाले टाकण्याआधी दहिवड्याचा भरलेला द्रोण उंच फेकतात. थोडं सुद्धा दही सांडत नाही. मला काही ही सर्कस फारशी आवडली नाही. खेळत काय बसायचं?पण लोकांना तेच जास्त आवडत होतं. तशी फर्माईश पण करत होते लोकं. मला गंमत वाटली. पण जर तुम्ही दहिवड्याचे शौकीन असाल तर एकदा तरी हा दहिवडा खाच. इतका चविष्ट आहे तो. मोठ्या प्रयत्नांनी 2 दहिवडे रिचवले. त्यातही दुसरा बडा बायकोला खाऊ घातला. माझं प्रेम मी सिद्ध केलं.
मग मागवला, भुट्टे का किस. म्हणजे आपलं मक्याचं कणीस. हा देखील मस्त आहे पदार्थ. मक्याचा किस दुधामध्ये शिजवला जातो. आणि मग चाट मसाले टाकून द्रोणात खायला देतात. शक्यतो मधु मका वापरला जातो. वेगळी आहे चव. एकदा जरूर चाखावी अशी
आता वळूच रूपांतर सुस्तवलेल्या रेड्यात झालं होतं. कारण पोटात जागा नव्हती. काय करावं सुचत नव्हतं. थोडी चक्कर मारून आलो आणि एखादा पदार्थ खाता येईल अशी शक्यता निर्माण झाली. समोरच एक नवीन पदार्थ दिसला. गराडू. नाव जरा विचित्र वाटलं. हे काय आहे सांगतो. रताळ्याच्या कुटुंबातील एक कंदमूळ म्हणजे गराडू. ह्याला चांगलं वर्षभर ठेवतात आणि काढतात मग ह्याला तळतात. आणि मग मस्तपैकी मीठ आणि चाट मसाला टाकून खातात. रताळ्याला स्वतःची एक चव असते तशी ह्याला नाही. कुटुंबातल्या मठ्ठ लेकराला पाहुणे आले की कस चांगले कपडे घालून, गंध पावडर करून त्यातल्या त्यात सामान्य दाखवण्याचा प्रयत्न करतात तसला प्रकार वाटला मला. तरीही एखादा ठोंब्या आपला पोपट करतोच तसंच काहीतरी ह्या पदार्थाचं झालंय.
नाही खाल्ला तरी चालेल. ह्यावर माझं नाव लिहिलेलं होतं म्हणून मी तो खाल्ला इतकंच. आता मात्र काहीही पोटात जाणं शक्यच नव्हतं. जिभेवर सगळ्या चवी फेर धरून नाचत होत्या. शांत वाटत होतं. इतरही अनेक पदार्थ आहेत इथे चाखण्यासारखे जसं की मोठी जिलेबी किंवा आपण तिला जिलेबा म्हणू. हिचा(की ह्याचा) आकार जरा जास्तच मोठा असतो चव काही फार वेगळी नसते असं मित्राचं म्हणणं आलं. खाणं तर शक्य नव्हतंच. त्यामुळे ते टाळलं. गुलाबजाम देखील जागोजागी दिसत होते. बाकी फायर पान आणि धुवा पान आताशा मिळायला लागलेत. त्यामुळे काही मोजक्याच पदार्थांचा आस्वाद घेऊन आणि तृप्त होऊन आम्ही सराफा बाजाराचा निरोप घेतला. बाकी सराफा बाजारात जाऊन सोन्यासारखं अन्न खाण्याची ही एकमेव जागा भारतात असावी असा मला दाट संशय आहे.
श्री अन्नपूर्णा प्रसन्न!
@Saishidorigroup_23
มุมมอง: 360

วีดีโอ

DescriptionHarishchandragad Trek Vlog🚩 | महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा कोकणकडा | HeavenlyKokankada
มุมมอง 457วันที่ผ่านมา
#shchandragad #kokankada #malshej #harishchandra #akole harishchandragad, harishchandragad trek, harishchandragad trek is dream trek of each and every traveller from Maharashtra, Harishchandragad Trek you can do from Pachnai village or Khireshwar Village. Harishchandragad is best trek for beginner. fort #Harishchandragad #harishchandratrek #harishchandra#kokankada #harishchandrafort #harishchan...
Dahi Handi Utsav 2024 | Shirdi | भव्य दहीहंडी महोत्सव शिर्डी येथे आलेल्या सर्व बँड, Shirdi | Band
มุมมอง 186วันที่ผ่านมา
#saishidori #band #dahihandi2024 #dahihandiutsav #govindapathak #shirdi Dahi Handi Utsav 2024 | Shirdi | भव्य दहीहंडी महोत्सव शिर्डी येथे आलेल्या सर्व बँड, Shirdi | Band Dahihandi Utsav Shirdi Shivsai Band Taharabad Dahihandi Utsav Shirdi Swar Samrat Band Swar Samrat Band 1001 Mauli Band Kolpewadi Balasaheb Brass Band Niphad Gurudatt Band Bobbys Band Malegaon #dahihandi2024 #jsamitrpathak #govi...
Bhandardara Hill Station | Vasundhara Waterfall Bhandardara Dharan | भंडारदरा हिल स्टेशन ट्रिप २०२४
มุมมอง 23921 วันที่ผ่านมา
#Bhandardara #VasundharaWaterfall #BhandardaraWaterfalls #ratangad #Bhandardara Bhandardara Hill Station | Vasundhara Waterfall Bhandardara Dharan | भंडारदरा हिल स्टेशन ट्रिप🤩😍🤗 रतनगड अमृतेश्वर प्राचीन शिव मंदिर दर्शन🙏🙇🏻🌸 २०२४ भंडारदरा Bhandardara भंडारदरा हे नाशिकपासून ७० कि.मी. वर असणारे निसर्गरम्य ठिकाण आहे. भंडारद-याचे खरे सौंदर्य हे पावसाळयानंतर अधिक खुलते, नाहीतर इतर वेळेला हा भाग अगदी रख...
१५ ऑगस्ट 🇮🇳२०२४ साई बाबा इंग्लिश मिडीयम स्कुल परेड ! #15august #परेड #shirdi #viralvlogs
มุมมอง 11121 วันที่ผ่านมา
१५ ऑगस्ट 🇮🇳२०२४ साई बाबा इंग्लिश मिडीयम स्कुल परेड ! #15august #परेड #shirdi #viralvlogs Independence Day 2024: 15 ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिवस. 1947 साली याच तारखेला आपल्या भारत देशाल स्वातंत्र्य मिळाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही देशवासीयांनी आठवडाभरापूर्वीचा स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. भारतीय स...
श्री साईसच्चरित पारायण सोहळा, सांगता मिरवणुक- २०२४ SHRI SAI SATCHARITRA PARAYAN SOHALA #shirdi #vlog
มุมมอง 44228 วันที่ผ่านมา
#saicharitra #parayan #shirdisaibaba #omsairam #saishidori श्री साईसच्चरित पारायण सोहळा, सांगता मिरवणुक- २०२३ SHRI SAI SATCHARITRA PARAYAN SOHALA #shirdi #vlog शिर्डी साईचरित्र पारायण संपुर्ण मिरवणूक ढोल ताशांच्या तालावर असंख्य महिलांचा ठेका Sai CharitraSai Charitra Parayan Miravnuk Shirdi Sai Sat Cahritra parayan संपुर्ण साईचरित्र पारायण मिरवणूक #saibaba #shirdisaibaba #saibabaofshirdi #saibab...
!आम्ही गेलो ! 🤩😍सरदार प्रतापसिंह मनोरंजन उदयान बागायला! sai prees gardan! #mulund #gardan
มุมมอง 129หลายเดือนก่อน
!आम्ही गेलो ! 🤩😍सरदार प्रतापसिंह मनोरंजन उदयान बागायला! sai prees gardan! #mulund #gardan
Shirdi Gurupornima Festival | शिर्डीत साईबाबा संस्थानच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला प्रारंभ ।#saishidori
มุมมอง 338หลายเดือนก่อน
Shirdi Gurupornima Festival | शिर्डीत साईबाबा संस्थानच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला प्रारंभ ।#saishidori
Shirdi Crowded For Ashadi Ekadashi | शिर्डी माझे पंढरपूर, साईंच्या शिर्डीत आषाढी एकादशीनिमित्त गर्दी
มุมมอง 446หลายเดือนก่อน
Shirdi Crowded For Ashadi Ekadashi | शिर्डी माझे पंढरपूर, साईंच्या शिर्डीत आषाढी एकादशीनिमित्त गर्दी
🔴Saibaba Live Darshan🙏🙇🏻🌸🌍❤️। श्री साईबाबा की नित्यसेवा 💕17 July 2024
มุมมอง 136หลายเดือนก่อน
🔴Saibaba Live Darshan🙏🙇🏻🌸🌍❤️। श्री साईबाबा की नित्यसेवा 💕17 July 2024
आषाढी एकादशीच्या निमित्त | साईबाबा इंग्लिश मीडियम स्कुल मधी पालखी सोहळा | #वारकरी #माऊली #पालखी
มุมมอง 498หลายเดือนก่อน
आषाढी एकादशीच्या निमित्त | साईबाबा इंग्लिश मीडियम स्कुल मधी पालखी सोहळा | #वारकरी #माऊली #पालखी
Kamla Nehru Prani Sangrahalaya | Indore Zoo | इंदौर चिड़ियाघर | Indore Madhya Pradesh |#indorezoo 🤩😍
มุมมอง 98หลายเดือนก่อน
Kamla Nehru Prani Sangrahalaya | Indore Zoo | इंदौर चिड़ियाघर | Indore Madhya Pradesh |#indorezoo 🤩😍
BIJASAN MATA MANDIR INDORE || बिजासन माता मंदिर इंदौर || saishidori VLOGS
มุมมอง 1782 หลายเดือนก่อน
BIJASAN MATA MANDIR INDORE || बिजासन माता मंदिर इंदौर || saishidori VLOGS
Hanuman Mandir | Pitra Parwat Indore | पित्र पर्वत | indor vlog |
มุมมอง 1852 หลายเดือนก่อน
Hanuman Mandir | Pitra Parwat Indore | पित्र पर्वत | indor vlog |
Mahakaleshwar Jyotirlinga Ujjain | Ujjain Tourist Places | Ujjain Mahakal Mandir | Ujjain Darshan
มุมมอง 2552 หลายเดือนก่อน
Mahakaleshwar Jyotirlinga Ujjain | Ujjain Tourist Places | Ujjain Mahakal Mandir | Ujjain Darshan
काल भैरव मंदिर उज्जैन | Kaal Bhairav MandirUjjain | Kaal Bhairav Story | Ujjain | saishidori vlog
มุมมอง 1502 หลายเดือนก่อน
काल भैरव मंदिर उज्जैन | Kaal Bhairav MandirUjjain | Kaal Bhairav Story | Ujjain | saishidori vlog
लाल बाग पॅलेस इंदौर | माँ वैष्णो देवी मंदिर इंदौर |🙏🙇🏻🌸
มุมมอง 1062 หลายเดือนก่อน
लाल बाग पॅलेस इंदौर | माँ वैष्णो देवी मंदिर इंदौर |🙏🙇🏻🌸
भक्ती शक्ति मंदिर संगमनेर | Bhakti Shakti Mandir🙏 #Sangamner #mandir #temple #viralvlogs #sangamner
มุมมอง 3262 หลายเดือนก่อน
भक्ती शक्ति मंदिर संगमनेर | Bhakti Shakti Mandir🙏 #Sangamner #mandir #temple #viralvlogs #sangamner
शिर्डी मे हूई जोरदार बारिश 😱| 5 जून 2024 | #shirdi #youtube #vlog #viralvlogs #barishvlog #subscribe
มุมมอง 1403 หลายเดือนก่อน
शिर्डी मे हूई जोरदार बारिश 😱| 5 जून 2024 | #shirdi #youtube #vlog #viralvlogs #barishvlog #subscribe
दौलताबाद किला | देवगिरी किला | Daulatabad Fort | Devgiri Fort|#fort 🚩#youtube #viralvlogs #subscribe
มุมมอง 1463 หลายเดือนก่อน
दौलताबाद किला | देवगिरी किला | Daulatabad Fort | Devgiri Fort|#fort 🚩#youtube #viralvlogs #subscribe
Ellora Caves | Kailasa Temple | Unesco World Heritage Site |वेरुळ लेणी | कैलाश मंदिर | #elloracave😍🤩
มุมมอง 3933 หลายเดือนก่อน
Ellora Caves | Kailasa Temple | Unesco World Heritage Site |वेरुळ लेणी | कैलाश मंदिर | #elloracave😍🤩
!!प्रदीप भाऊ चे !! जागरण गोंधळ !! वाघ्या मुरळी😍🤩#jagarangondhal #वाघ्या_मुरळी_जागरण_गोंधळ_पार्टी_😍
มุมมอง 2.2K3 หลายเดือนก่อน
!!प्रदीप भाऊ चे !! जागरण गोंधळ !! वाघ्या मुरळी😍🤩#jagarangondhal #वाघ्या_मुरळी_जागरण_गोंधळ_पार्टी_😍
Bhadra Maruti Mandir Khultabad darshan | भद्रा मारुती मंदीरदर्शन | Hanuman Mandir Bhadra Maruti Te🙏🌸
มุมมอง 1253 หลายเดือนก่อน
Bhadra Maruti Mandir Khultabad darshan | भद्रा मारुती मंदीरदर्शन | Hanuman Mandir Bhadra Maruti Te🙏🌸
Grishneshwar jyotirlinga temple darshan | घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग का दर्शन | Elora caves #घृष्णेश्वर
มุมมอง 1923 หลายเดือนก่อน
Grishneshwar jyotirlinga temple darshan | घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग का दर्शन | Elora caves #घृष्णेश्वर
रघुनाथ पेशवे समाधी । तीन भिंतीचा अपूर्ण वाडा | कोपरगाव | अ.नगर | Hingani cha wada | Raghoba Cenotaph
มุมมอง 4253 หลายเดือนก่อน
रघुनाथ पेशवे समाधी । तीन भिंतीचा अपूर्ण वाडा | कोपरगाव | अ.नगर | Hingani cha wada | Raghoba Cenotaph
पोथी व फोटो की शोभायात्रा | श्री साई रामनवमी उत्सव, रथ यात्रा शिरडी २०२४ | #ramnavmi2024
มุมมอง 754 หลายเดือนก่อน
पोथी व फोटो की शोभायात्रा | श्री साई रामनवमी उत्सव, रथ यात्रा शिरडी २०२४ | #ramnavmi2024
!!एकरुखे येथील श्री वज्रेश्वरी माता मंदिराची यात्रा उस्तव मोठ्या आनंदाने पार पडला२०२४!! 🙏🙇🏻🌸#एकरुखे
มุมมอง 724 หลายเดือนก่อน
!!एकरुखे येथील श्री वज्रेश्वरी माता मंदिराची यात्रा उस्तव मोठ्या आनंदाने पार पडला२०२४!! 🙏🙇🏻🌸#एकरुखे
!!रामनवमी उत्सव निमित्ताने साई कावड यात्रा दिवस १ला शिर्डी २०२४ !#kavad #kavadyatra#ramnavmi #shirdi
มุมมอง 644 หลายเดือนก่อน
!!रामनवमी उत्सव निमित्ताने साई कावड यात्रा दिवस १ला शिर्डी २०२४ !#kavad #kavadyatra#ramnavmi #shirdi
!! साईंबाबा के दरबार में अनोखीं हनुमान जयंती ! 🧡🚩#hanumanjayanti #shirdi #viralvlogs #hanumantemple
มุมมอง 1094 หลายเดือนก่อน
!! साईंबाबा के दरबार में अनोखीं हनुमान जयंती ! 🧡🚩#hanumanjayanti #shirdi #viralvlogs #hanumantemple
निमगाव (कोऱ्हाळे)हनुमान जयंती उत्सव ! खंडोबा यात्रा ! २०२४ hanuman jayanti ustav! nimgaon..🧡🚩😍
มุมมอง 2084 หลายเดือนก่อน
निमगाव (कोऱ्हाळे)हनुमान जयंती उत्सव ! खंडोबा यात्रा ! २०२४ hanuman jayanti ustav! nimgaon..🧡🚩😍