Newslive8in
Newslive8in
  • 81
  • 28 077
Nagpur- शंभरावर मुली तरुणी आणि विवाहित महिलांचे लैंगिक शोषण | नागपूर
डॉक्टरांना देवदूत मानले जाते. मात्र, एका डॉक्टराने एक दोन नव्हे शेकडो मुली, तरुणी तसेच विवाहित महिलांचे शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या परिसरात उघडकीस आला. या नराधमाला अटक करून त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
मागील १५ वर्षांपासून हा मानसोपचारतज्ज्ञ रुग्णांवर उपचार करीत असून महिलांशी अश्लील कृत्य करतानाच तो चित्रफीत तयार करायचा , पीडितांना ब्लॅकमेल करून वारंवार शारीरिक संबंध ठेवायचा अशी माहिती समोर आली आहे. यातीलच तीन पीडितांनी हिंमत दाखवित त्याच्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. स्वतः पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी आता हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
मानसोपचारतज्ज्ञ आरोपी राजेश याने हुडकेश्वर येथील राहत्या घरी क्लिनिक उघडले होते. तो अनेकदा सहलीचे आयोजनही करायचा. उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन मुली, विवाहित महिला आणि तरुणींशी अश्लील चाळे करताना तो चित्रफिती तयार करायचा. याव्यतिरिक्त थेट क्लिनिकमध्ये त्याने अनेक महिलांशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. या चित्रफिती संबंधित मुली, तरुणी, महिलांना दाखवत तो त्यांना वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडायचा. सहलीच्या आयोजनात तो अनेकदा हॉटेल किंवा फार्महाऊसवर पीडितांवर लैंगिक अत्याचार करायचा. याप्रकरणी पोलिसांनी राजेशविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. राजेशची पत्नी फरार असून त्याने तिचेही लैंगिक शोषण केले असून बलात्काराचा गुन्हा दाखल होण्याच्या भीतीपोटी राजेशने तिच्याशी लग्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पोलिसांनी आरोपी मानसोपचार तज्ज्ञाच्या कार्यालयातून एक हार्ड डिस्क जप्त केली असून त्यामध्ये अनेक आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ आढळल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आरोपी मानसोपचार तज्ज्ञाने आजवर अनेक तरुणी आणि अल्पवयीन मुलींसोबत गैरकृत्य केले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे
มุมมอง: 415

วีดีโอ

Kamptee - बाबू हरदास एल. एन. व दादासाहेब कुंभारे पुण्यस्मृती सोहळा | कामठी
มุมมอง 2664 ชั่วโมงที่ผ่านมา
जगातील प्रत्येक शोषित, वंचित आणि दलित समाजाच्या आदराचा नारा म्हणून 'जय भीम'चा नारा मोठ्या अभिमानाने लावला जातो. या घोषवाक्याचे जनक बाबू हरदास एल. एन. आणि त्यांच्या समाज कार्यला पुडे नेणारे कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 15 जानेवारी रोजी हरदास स्मारक, हरदास घाट, कन्हान नदी, कामठी येथे स्मृती सभेचे आयोजन केले जाते. स्मृती दिन निमित्य बाबू हरदास एल.एन.समता सैनिक दलाच्या नेतृत्...
Kamptee - एमडी प्रकरण ,आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी । कामठी
มุมมอง 6314 ชั่วโมงที่ผ่านมา
नागपूर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीत येरखेडा ग्रामपंचायत समोरच्यां मोकळ्या मैदानात एमडी मादक अमली द्रव्य पदार्थाची विक्री करत असता एका तरुणाला रगेहात अटक करण्यात आले आहे, पोलिसांनी या कारवाईत 6 ला 34 हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे , पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अझहर अहमद अन्सारी वलद एजाज अहमद अन्सारी वय 37 वर्ष राहणार वारीसपुरा दरोगा मज्जिद जवळ कामठी आ...
Kamptee - पोंगल उत्सव , स्वयंचालित झांकीया मुख्य आकर्षण का केंद्र | कामठी
มุมมอง 4387 ชั่วโมงที่ผ่านมา
हर वर्ष की तरह इस वर्ष भी मकर संक्रांति के पावन पर्व पर छत्री समाज की ओर से पोंगल उत्सव मनाया गया , इस पोंगल उत्सव के अवसर पर शहर में भव्य शोभायात्रा निकाली गई,ढोल, डीजे के धुन पर शहर के मुख्य मार्ग से यह शोभायात्रा का भ्रमण किया गया, इस शोभायात्रा में स्वयंचालित झांकीया मुख्य आकर्षण का केंद्र रही, वही भगवान विट्ठल रुक्मिणी, श्री गणेशजी की प्रतिमा की झांकी इस रैली में शामिल की गई थी , शहर में प...
अरोली - महसूल मंत्रीच्या जिल्यात अवैध रेती वर दणकेबाज कारवाई , २.१९ कोटींचा मुद्देमाल जप्त । नागपूर
มุมมอง 1987 ชั่วโมงที่ผ่านมา
रेतीच्या चोरट्या वाहतुकीत वाढ होत असताना अरोली पोलिसांच्या पथकाने एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी चार कारवाई करीत विनारॉयल्टी रेती वाहतूक करणारे चार टिप्पर आणि ४१ ब्रास रेती पकडली. यात टिप्पर चालकांसह मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण २ कोटी १९ ला ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मिडल्या माहिती अनुसर मौदा तालुक्यातील अडेगाव-अरोली मार्गावर पोलीस गस्त करत असता चार टिप्पर रेती वाहतू...
Nagpur - उद्योजकांना प्रोत्साहन देणारे ग्रामायण उद्यम प्रदर्शन १६ पासून | नागपूर
มุมมอง 157 ชั่วโมงที่ผ่านมา
देशाच्या समृद्धीत भर टाकणाऱ्या उद्योग उद्योजकांना प्रोत्साहन देणारे ६वे ग्रामायण उद्यम प्रदर्शन १६ ते २० जानेवारी दरम्यान नागपुरात आयोजित करण्यात येत आहे. 'नोकर नाही, मालक व्हा, आणि इतरांना नोकऱ्या द्या' असा संदेश हे प्रदर्शन देणार आहे. सहाव्या ग्रामायण प्रदर्शनाचे उद्घाटन १६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. हे प्रदर्शन अमृत भवन आंध्र असोसिएशन परिसर, उत्तर अंबाझरी मार्ग, झाशी राणी च...
Parshivani - वाघाच्या हल्यात शेतमजुरांच्या मृत्यू, ग्रामस्थ आक्रमक केला चक्का जाम । पारशिवनी
มุมมอง 2.2K9 ชั่วโมงที่ผ่านมา
नागपूर जिला अंतर्गत पारशिवनी तालुक्यातील आमगाव गावा शेजारील शेतात शेत मजुर सहादेव नथुजी सूर्यवंशी हा तुर कापणी चे काम करत असताना रविवारी दुपारी अचानक पट्टेदार वाघाने सहादेव यांचेवर हल्ला करुन त्याची शिकार केली त्यात सहादेव हा जागीच मृत्यू पावलयाची घटना रविवारच्या दि ११ जानेवारीला सायंकाळी उघडकिस आली होती. सायंकाळ झाल्यानंतरही सहादेव घरी परत आला नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध घेत शेत शि...
Kamptee - युवा चेतना मंच तर्फे राष्ट्रीय युवा दिन साजरा । कामठी
มุมมอง 2569 ชั่วโมงที่ผ่านมา
स्वामी विवेकानंद यांच्या १६३व्या जयंती व "राष्ट्रीय युवा दिन" निमित्त रनाळा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सचिन गोसावी उपविभागीय अधिकारी (एस.डी.ओ) मौदा,तर विशेष अतिथी श्री गणेश जगदाळे तहसीलदार कामठी, प्रमु पाहुणे म्हणून श्री पंकज साबळे सरपंच ग्रामपंचायत रनाळा , युवा चेतना मंच चे राष्ट्रीय सचिव दत्ता शिर्के , सुचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकार चे सदस्य संजय...
Mauda - गोवंश जनावरांची तस्करी 27 जनावरांची सुटका पोलिसांची यशस्वी कारवाई । मौदा
มุมมอง 17912 ชั่วโมงที่ผ่านมา
मौदा- गस्तीदरम्यान मौदा पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोवंशाच्या जनावरांची तस्करी करणारे दोन वाहने ताब्यात घेत या कारवाईत मौदा पोलिसांनी दोन्ही वाहनांच्या चालकांना अटक करून त्यांच्या ताब्यातून 27 जनावरांची सुटका केली.ही जनावरे कत्तलीसाठी कत्तलखान्यात नेली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार भंडाराहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या एमएच 40/सीटी 4470 क्रमांकाच्या ट्रकमधून जनावरांच...
Kamptee - 'राष्ट्रीय युवा दिन' मोठ्या उत्साहात साजरा | कामठी
มุมมอง 47512 ชั่วโมงที่ผ่านมา
भारतात दरवर्षी १२ जानेवारीला 'राष्ट्रीय युवा दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते. भारत सरकारने १९८४ मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा दिवस हा 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर, १९८५ पासून दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंतीच्या दिवशी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. ही परंपरा आजतागायत क...
Buldhana - केस गळती प्रकरणं,आठवड्याभरापासून गावकऱ्यांनी आंघोळच केली नाही | बुलढाणा
มุมมอง 79712 ชั่วโมงที่ผ่านมา
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील चार गावांतील केस गळतीची लागण आता जवळपास ११ गावातील नागरिकांना झालीय .. तर 51 रुग्ण वरून रुग्णाची संख्या आता 126 वर गेलीय .. दुसरीकडे पाण्याचा वापर आंघोळीसाठी करू नये असा आव्हान शासनाने केल्यानंतर मागील आठवडाभरापासून गोंडगाव येथील गावकऱ्यांनी आंघोळच केले नसल्याची बाब समोर आली आहे. केस गळतीचे प्रकरणं समोर आल्यावर आरोग्य पथक गावात ठाण मांडून आहे .. लागण असलेल्...
Nagpur - साडेचारशे सायलेंसरचा रोडरोलरने चिरडला 'आवाज' । नागपुर
มุมมอง 38716 ชั่วโมงที่ผ่านมา
नागपूर: शहरातील सर्वात वर्दळीच्या चौकात असलेल्या आरबीआय येथे जप्त केलेल्या सायलेन्सरवर शहर पोलिसांनी पुष्पा स्टाईलने रोडरोलर चालवला. ध्वनी प्रदूषण करण्यासाठी ज्या बाईकमध्ये बदल करण्यात आले होते त्या बाईकमधून हे सर्व सायलेन्सर काढून टाकण्यात आले आहे. नागपूर पोलिसांकडून बेकायदेशीर दारू आणि मोडिफाइड सायलेन्सरविरुद्ध सातत्याने कारवाई केली आहे. अलिकडेच आयुक्तांनी रोडरोलर चालवून ६० ला रुपयांची अवैध द...
Mauda - एनटीपीसी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत ग्रामीण क्रीडा स्पर्धाचे आयोजन - मौदा
มุมมอง 7516 ชั่วโมงที่ผ่านมา
एनटीपीसी मौदा, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत, गुरुवारी शिवाजी स्टेडियम, उत्कर्ष नगर मौदा येथे एक दिवसीय ग्रामीण क्रीडा स्पर्धा आयोजित केली. एनटीपीसी मौदा प्रकल्पाजवळील गावे, हिवरा, गंगानेर, खंडाळा, नवेगाव (आष्टी), तरसा, अजनगाव आणि धामणगाव यांनी यामध्ये भाग घेतला. स्पर्धा. शाळांमधील १२२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे उद्घाटन एनटीपीसी मौदा प्रकल्प प्रमु हिम्मत सिंग चौहान, ...
Kanhan - सुरक्षा कर्मचाऱ्यांवर तलवारींने हल्ला करणारे अटक । कन्हान
มุมมอง 9916 ชั่วโมงที่ผ่านมา
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तहसील अंतर्गत येणाऱ्या इंदर-कामठी डीप ओपनकास्ट माइन्सच्या गस्ती पथकावर हल्ला करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांसह तीन आरोपींना कन्हान पोलिसांनी ४८ तासांच्या आत अटक केली आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कामठी कलारी येथील रहिवासी असलेला मुख्य आरोपी आदित्य राय याला कोळसा चोरी प्रकरणात निर्दोष असूनही WCL सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मारहाण आणि शिवीगाळ केली होती. याचा बदल...
Kamptee - ग्रामीण भागात उत्तम दर्जेदार राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय खेळाडू - संकेत बावनकुळे । कामठी
มุมมอง 43219 ชั่วโมงที่ผ่านมา
ग्रामीण भागातील खेळाडूंना खेडण्यासाठी नवीन प्लॅटफॉर्म मीळावा या उद्देशातुन कामठी तालुक्यातील आजनी गावात विविध खेळाडूंचा मेळावा घेण्यात आला. हे आयोजन कामठी ग्रामीण भागातील खेळाडूना खेळात नाविन्य प्राप्त करून आपला व आपल्या गावाचा नाव लौकिक होऊन ग्रामीण भागातील खेळाडू यांना विविध ठिकाणी होणाऱ्या स्पर्धानमध्ये खेडण्याची संधी मीळवून देण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या वेळी खेळाडूं...
Nagpur - 16 दुचाकीस्वार निघाले बुमला खिंडी ते दिल्ली प्रवास , रॅली चे शहरात स्वागत । नागपुर
มุมมอง 4621 ชั่วโมงที่ผ่านมา
Nagpur - 16 दुचाकीस्वार निघाले बुमला खिंडी ते दिल्ली प्रवास , रॅली चे शहरात स्वागत । नागपुर
Nagpur - वाघिण आणि तिच्या पाच पिल्लांना का घेरले | नागपूर
มุมมอง 67421 ชั่วโมงที่ผ่านมา
Nagpur - वाघिण आणि तिच्या पाच पिल्लांना का घेरले | नागपूर
Mauda - टिप्परचालक सह, जेसीबी जप्त ३२ लाख २० हजार रुपयांचा मुद्दे पोलिसांच्या ताब्यात । मौदा
มุมมอง 15221 ชั่วโมงที่ผ่านมา
Mauda - टिप्परचालक सह, जेसीबी जप्त ३२ ला २० हजार रुपयांचा मुद्दे पोलिसांच्या ताब्यात । मौदा
Kamptee - विद्यार्थ्यांना दिले सोशल मीडिया सुरक्षिततेचे आणि नायलॉन मांजा न वापरणाचे धडे। कामठी
มุมมอง 311วันที่ผ่านมา
Kamptee - विद्यार्थ्यांना दिले सोशल मीडिया सुरक्षिततेचे आणि नायलॉन मांजा न वापरणाचे धडे। कामठी
Nagpur - सुधार प्रन्यास मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार . बंटी शेळके | नागपूर
มุมมอง 225วันที่ผ่านมา
Nagpur - सुधार प्रन्यास मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार . बंटी शेळके | नागपूर
Nagpur - देवेंद्र फडणवीस यांनी एकता आणि समतेचा संदेश देत अजमेर शरीफ ला चादर पाठवली |नागपूर
มุมมอง 120วันที่ผ่านมา
Nagpur - देवेंद्र फडणवीस यांनी एकता आणि समतेचा संदेश देत अजमेर शरीफ ला चादर पाठवली |नागपूर
Kamptee - नवीन कामठी पोलीस तर्फे “Raising Day” कारेक्रमाचे आयोजन ,शेकडो विध्यायर्थी सहभागी । कामठी
มุมมอง 270วันที่ผ่านมา
Kamptee - नवीन कामठी पोलीस तर्फे “Raising Day” कारेक्रमाचे आयोजन ,शेकडो विध्यायर्थी सहभागी । कामठी
Mauda - पोलिसांची मोठी कारवाही ११ जुगारी अटक ऐकून १२ लक्ष ९२ हजार रुपयांचा मुद्दे माल जप्त । मौदा
มุมมอง 174วันที่ผ่านมา
Mauda - पोलिसांची मोठी कारवाही ११ जुगारी अटक ऐकून १२ लक्ष ९२ हजार रुपयांचा मुद्दे माल जप्त । मौदा
Nagpur - - गोस्वामी समाज महासभाच्या वतीने दिनदर्शिका विमोचन । नागपूर
มุมมอง 189วันที่ผ่านมา
Nagpur - - गोस्वामी समाज महासभाच्या वतीने दिनदर्शिका विमोचन । नागपूर
Kamptee -वाट चुकलेल्या बारासिंग हरणावर कुत्र्याचा हल्ला,बारासिंगचा मृत्यू । कामठी
มุมมอง 148วันที่ผ่านมา
Kamptee -वाट चुकलेल्या बारासिंग हरणावर कुत्र्याचा हल्ला,बारासिंगचा मृत्यू । कामठी
Kamptee - ऐतिहासिक संकल्प यात्रेचे रनाळा येथे भव्य स्वागत । कामठी
มุมมอง 488วันที่ผ่านมา
Kamptee - ऐतिहासिक संकल्प यात्रेचे रनाळा येथे भव्य स्वागत । कामठी
Khaparkheda - देशीकट्ट्यातून गोळीबार करून हत्या ,चार आरोपींना अटक
มุมมอง 4วันที่ผ่านมา
Khaparkheda - देशीकट्ट्यातून गोळीबार करून हत्या ,चार आरोपींना अटक
Kamptee - कुत्र्यांच्या हल्ल्यात हरिणीचा मृत्यू , छावणी परिसरातील घटना
มุมมอง 492วันที่ผ่านมา
Kamptee - कुत्र्यांच्या हल्ल्यात हरिणीचा मृत्यू , छावणी परिसरातील घटना
Khaprkheda -देशीकट्ट्यातून गोळीबार करून हत्या, चार आरोपी अटक
มุมมอง 29วันที่ผ่านมา
Khaprkheda -देशीकट्ट्यातून गोळीबार करून हत्या, चार आरोपी अटक
Nagpur -नागपूर पोलिसांनी 60 लाखांपेक्षा अधिकचा दारू साठा बुलडोझरच्या खाली चिरडून टाकला
มุมมอง 12214 วันที่ผ่านมา
Nagpur -नागपूर पोलिसांनी 60 लाखांपेक्षा अधिकचा दारू साठा बुलडोझरच्या खाली चिरडून टाकला

ความคิดเห็น